Pune Crime News | वडिलांच्या पाठोपाठ सहा महिन्यानंतर मुलाचीही आत्महत्या; कुंजीरवाडी परिसरात हळहळ

Suicide

हवेली : Kunjirwadi Pune Crime News | मागील सहा महिन्यांपूर्वीच वडिलांनी आत्महत्या केली असल्याची घटना घडलेली असताना, आता मुलानेही राहत्या घरात साडीच्या साहाय्याने पंख्याला गळफास (Hanging Case) घेऊन आत्महत्या (Suicide Case) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कुंजीरवाडी (ता.हवेली) ग्रामपंचायत जवळ बुधवारी (दि.३१) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. वडिलांच्या पाठोपाठ मुलानेही आत्महत्या केल्याने कुंजीरवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

सनी हनुमंत गावडे (वय २२, रा.कुंजीरवाडी,ता.हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गणेश हनुमंत गावडे (वय २५) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) माहिती दिली आहे तर सहा महिन्यांपूर्वी गणेशचे वडील हनुमंत खंडू गावडे (वय ४३) यांनीही आत्महत्या केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सनी गावडे हा बेरोजगार होता. तसेच त्याला दारूचे व्यसन मोठ्या प्रमाणात लागले होते. दरम्यान, बुधवारी सकाळी गणेश गावडे याला त्याचा भाऊ सनी हा घरात गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

त्यानंतर या घटनेची माहिती गणेश यांनी लोणी काळभोर पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश नलवडे, सुवर्णा गोसावी, पोलीस हवालदार महेश करे, घनशाम आडके व पोलीस पाटील मिलिंद कुंजीर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. (Pune Crime News)

पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने सनी गावडे याचा मृतदेह खाली उतरविला आणि शवविच्छेदन करण्यासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवला आहे. सनी गावडे याने आत्महत्या का केली? याचे करण अद्याप समोर आले नाही.

याबाबतचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.
दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपूर्वी सनीचे वडील हनुमंत गावडे यांनीही आत्महत्या केली होती.
आत्महत्येचे कारण अद्यापही समोर आलेले नाही.

दरम्यान मुलगा सनी गावडे यानेही आज आत्महत्या केली आहे.
पिता-पुत्राच्या आत्महत्येमुळे कुंजीरवाडी गावावर शोककळा पसरली आहे.
तर गावडे कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police News | घरातून रागाच्या भरात निघून गेलेला अल्पवयीन मुलगा सापडला जबलपूरला !
रेल्वे स्टेशनला विकत होता पाण्याच्या बाटल्या, पोलीस आयुक्तांकडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर

Pune Police Inspector Transfers | पुणे शहरातील 20 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; जाणून घ्या कोणाची कोठे झाली बदली

Eknath Shinde On Uddhav Thackeray | “मराठा आरक्षणाचा चेंडू मोदींच्या कोर्टात टाकून…”
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले, “दोन समाजामध्ये भांडणे …”

UBS Securities Issue Public Notice | शेयर बाजारात फसवणूक करणार्‍यांपासून सावधान!
ब्रोकरेज फर्मकडून बहुरूप्यांची पोलखोल, पैसे लावण्यापूर्वी करा 100 वेळा विचार