Pune Crime News | भांडणामध्ये वडिलांना मारहाण केल्याच्या रागातून मुलाने दरवाजावर पेट्रोल टाकून घर पेटवून देण्याचा केला प्रयत्न, सहकारनगर पोलिसांनी मुलाला केली अटक

crime

पुणे : Pune Crime News |  जुन्या भांडणाच्या रागातून दोन गटात धनकवडीत भांडणे झाली होती. सहकारनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन चौघांना अटक केली. त्यांच्या घरातील एक महिला घरी असताना फिर्यादीच्या मुलाने आरोपीच्या दरवाजावर पेट्रोल टाकून घर पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सहकारनगर पोलिसांनी मुलाला अटक केली आहे.

ओम्या ऊर्फ श्रवण दीपक घोडके Omya alias Shravan Deepak Ghodke (वय २०, रा. शांतीनगर वसाहत, संभाजीनगरचे शेजारी, धनकवडी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत दीपाली दिनेश शेंडगे (वय ४०, रा. महात्मा फुले सोसायटी, संभाजीनगर, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश घोडके याने फिर्यादी यांचा मुलगा यश शेंडगे याला ३ मार्च रोजी सकाळी जीवे मारण्याची धमकी दिली. या कारणावरुन त्याच दिवशी रात्री चव्हाणनगरमध्ये दिनेश अरुण शेडगे (वय ४४), निलेश  अरुण शेंडगे (वय ३०), यश दिनेश शेंडगे (वय १९), अनिल मारुती सांळुखे यांनी निलेश अर्जुन तावरे, दीपक घोडके यांच्यामध्ये भांडणे झाली होती. आरोपींनी निलेश तावरे याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून गंभीर जखमी केले. निलेश तावरे याच्यावर अजूनही रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दीपक घोडके हे ही या घटनेत जखमी झाले होते.

सहकारनगर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन चौघांना अटक केली. त्यामुळे घरात फिर्यादी दीपाली शेंडगे या एकट्याच होत्या. दिवसभर कोर्टामधील कामे उरकून त्या सायंकाळी घरी आल्या. दरवाजा लावुन त्या आराम करत होत्या. त्यावेळी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराच्या दरवाजावर खुड बुड करण्याचा आवाज ऐकू आला. त्यामुळे त्यांना जाग येऊन पेट्रोलचा वास आला. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले तर श्रवण दीपक घोडके हा हातामध्ये पेट्रोलची बाटली घेऊन दरवाजावर ओतत असलेला दिसला. त्यांनी तात्काळ त्याला काय करतो रे, असे म्हणून ओरडल्या. ओम्याने हातातील काडेपटीमधील काडी पेटवु लागला. हे पाहून त्यांनी आरडाओरडा केला. त्यांनी तातडीने ११२ वर फोन करुन माहिती दिली. पोलीस लागलीच तेथे पोहचले. पोलिसांनी ओम्या ऊर्फ श्रवण घोडके याला पकडले. पोलीस उपनिरीक्षक सद्दामहुसेन फकीर तपास करीत आहेत.

You may have missed