Pune Crime News | सार्वजनिक ठिकाणाावरील अवैध घटना रोखण्यासाठी विशेष मोहिम; मध्य शहरातील 41 ठिकाणांची तपासणी, गैरवर्तन करणार्या 22 जणांवर खटले दाखल
पुणे : Pune Crime News | शहर पोलीस दलातील परिमंडळ १ मधील सार्वजनिक ठिकाणी घडणारे गुन्हे, अवैध अंमली पदार्थ सेवन करणारे तसेच सार्वजनिक सुरक्षेला बाधा आणणार्या घटना रोखण्यासाठी गुरुवारी रात्री विशेष मोहिम आयोजित करण्यात आली होती.
फरासखाना, विश्रामबाग, समर्थ, खडक, डेक्कन, शिवाजीनगर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही विशेष मोहिम गुरुवारी रात्री ७ ते ९ वाजेच्या दरम्यान ही मोहिम राबविण्यात आली.
या परिसरातील ४१ सार्वजनिक ठिकाणे, ब्लॅकस्पॉट, मोकळी मैदाने यांची तपासणी करण्यात आली. त्यात सार्वजनिक रस्ते अडविणार्या दोघांवर खटले, गुटखा विक्री करणार्यांवर ५ खटले, ट्रिपल सीट जाणार्या १० जणांवर गुन्हे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणार्या एकावर कारवाई, नो एंटीमधून येणार्या तिघांवर कारवाई करण्यात आली. तसेच सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणार्या २२ जणांवर खटले भरण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले व परिमंडळ एक कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.
