Pune Crime News | सुपरवायझरवर चाकूने वार; रहाटणीमधील घटना
पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | गाडीतून कचरा बाहेर आल्याने तो दाबून घे असे सांगणार्या सुपरवायझरवर चाकूने वार करुन जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे (Attempt To Murder). ही घटना रहाटणीमधील (Rahatani) साई ज्योती पार्क येथे बुधवारी सकाळी साडेसात वाजता घडली. (Stabbing Case)
याप्रकरणी प्रशांत ज्ञानेश्वर ओझरकर (वय ३०, रा. रिहे, ओझरकरवाडी, मुळशी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विवेक संतोष अडागळे Vivek Santosh Adagale (वय २८) आणि अर्जुन गालफडे Arjun Galphade (वय २६) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक अडागळे आणि अर्जुन गालफडे हे कचरा गाडीवर चालक व कामगार आहेत. कचरा गाडी साई ज्योती पार्क येथे आली होती. त्यावेळी फिर्यादी यांनी गाडीतून कचरा बाहेर आलेला पाहिला. गाडी चालक व कामगारांना कचरा आत दाबण्यास सांगितले. त्यावर अर्जुन गालफडे याने मी कचरा दाबून घेणार नाही. तुला गरज असेल तर तु खाली उतर आणि कचरा दाबून घे, असे म्हणाला. यावर फिर्यादी यांनी मी तुझ्या वरच्या पोस्टवर काम करतो, असे सांगितले. याचा आरोपींना राग आला. विवेक अडागळे याने फिर्यादी यांना पकडले. अर्जुन गालफडे याने कचर्यातील घरगुती वापरातील चाकूने फिर्यादी यांच्या हातावर मारुन जखमी केले. शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी तपास करीत आहेत. (Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Rains | पुण्यात पावसाचा हाहाकार! सोसायट्यांमध्ये छातीपर्यंत पाणी; NDRF चे पथक मदतीसाठी दाखल
Lavasa Landslide | लवासामध्ये दरड कोसळल्याने 2 व्हिला गाडले गेले; तीन ते चार जण बेपत्ता
Pune Rainfall Update | पुणेकरांसाठी आणखी धोक्याची घंटा; हवामान विभागाकडून इशारा; रेड अलर्ट जारी