Pune Crime News | बँकेच्या एटीएम मशीनमधील रोकड नेली चोरुन; चावीने एटीएम उघडून केली चोरी

ATM

पुणे : MG Road Pune Crime News | एटीएम मशीनच्या चावीचा वापर करुन त्यातील पैसे ठेवण्याचे दोन कॅसेटसह ७ लाख रुपये चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे.

ही घटना कॅम्पमधील एम जी रोडवरील मुस्लीम को ऑप बँकेच्या (Muslim Co Op Bank Ltd Pune) एटीएममध्ये २० ते २४ जुलै दरम्यान घडली. याबाबत सरफराज मेहबुब तडवी (वय ५५, रा. कोंढवा) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरफराज तडवी हे मुस्लीम को ऑप बँकेत उपव्यवस्थापक आहेत. बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. कॅम्पमधील शाखेच्या खाली असलेल्या एटीएममध्ये त्यांनी २० जुलै रोजी ५०० रुपयांच्या १७८७ नोटा व १०० रुपयांच्या १२७५ अशा नोटा सेट बॉक्समध्ये भरल्या. त्यावेळी एटीएम मशीनमध्ये एकूण १० लाख २१ हजार रुपये होते. २४ जुलै रोजी एका ग्राहकाने एटीएममधून पैसे निघत नसल्याची तक्रार केली. तेव्हा त्यांच्या कॉम्प्युटरवर ८ लाख ७६ हजार रुपये एटीएममध्ये शिल्लक असल्याचे दाखविले जात होते.
ते एटीएममध्ये आले. त्यांनी एटीएम मधील उघडले. तेव्हा कोणीतरी चावीने एटीएम उघडले.
त्यातील दोन कॅश सेट बॉक्ससह एकूण ८ लाख ७६ हजार रुपये चोरुन नेल्याचे आढळून आले.
लष्कर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून पोलीस उपनिरीक्षक कांबळे तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Rains | पुण्यात पावसाचा हाहाकार! सोसायट्यांमध्ये छातीपर्यंत पाणी; NDRF चे पथक मदतीसाठी दाखल

Lavasa Landslide | लवासामध्ये दरड कोसळल्याने 2 व्हिला गाडले गेले; तीन ते चार जण बेपत्ता

Pune Rainfall Update | पुणेकरांसाठी आणखी धोक्याची घंटा; हवामान विभागाकडून इशारा; रेड अलर्ट जारी

You may have missed