Pune Crime News | दुचाकी अडवल्याने पोलिसांना धक्काबुक्की ! ‘प्रतिक माझा मित्र आहे त्याला कोणी हात लावला तर त्याला चौकात गोळ्या घालीन’ पोलिसांनाच धमकी

police

शिक्रापुर येथील घटना

शिक्रापूर (सचिन धुमाळ) – Shikrapur Pune Crime News | पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूर मधील चाकण चौकात (Chakan Chowk Shikrapur) वाहतूक नियमनाचे काम करत असताना बुलेटच्या सायलेन्सर मधून कर्कश आवाज काढणाऱ्या दुचाकी स्वारांना पोलिसांनी अडवल्याने दोघांनी पोलिसांशी हुज्जत घालत पोलिसांना धमकी देत धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे,

या प्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन (Shikrapur Police Station) येथे प्रतिक बाळासाहेब आढाव व दादा अंकुश चव्हाण या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे पुन्हा पुण्यात कायद्याचे रक्षण करणारे पोलीसच सुरक्षित नसल्याने सर्वसामान्य नागरिकाचे काय? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

याबाबत मिळालेली माहिती नुसार शिक्रापूर येथील चाकण चौकात रात्री अकराच्या सुमारास पोलीस हावलदार श्रीमंत होनमाने, पोलीस नाईक शिवाजी चीतारे, रोहिदास पारखे, विकास मोरे हे वाहतूक नियमांचे काम करत होते. यावेळी एम एच १२ एम एम ८१०० या बुलेट दुचाकीहून एक युवक सायलेन्सर मधून कर्कश आवाज काढत आला. पोलिसांनी त्याला थांबवत नाव विचारून चौकशी केली असता, पोलिसांना अरेरावी करुन लागल्याने पोलीस त्याला पोलीस स्टेशन येथे घेऊन जात असताना दादा चव्हाण हा युवक तेथे आला त्याने पोलिसांना दमदाटी करत माझी बुलेट आहे, तुम्ही घेऊन जायची नाही, प्रतिक माझा मित्र आहे त्याला कोणी हात लावला तर त्याला चौकात गोळ्या घालीन अशी धमकी देत पोलिसांशी हुज्जत घालत पोलीस शिपाई विकास मोरे यांची कॉलर पकडली, त्याच्या हाताला दुखापत केली, यावेळी पोलिसांनी पोलीस स्टेशन मध्ये फोन करुन पोलीस शिपाई प्रताप कांबळे व स्वप्नील गांडेकर यांना बोलावून घेत त्यांच्या दुचाकीसह दोघांना ताब्यात घेतले. (Pune Crime News)

याबाबत पोलीस शिपाई विकास बाबासाहेब मोरे रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे
यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने प्रतिक बाळासाहेब आढाव रा. करवंदी ता. नेवासा जि. अहमदनगर
व दादा अंकुश चव्हाण रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व प्रतिक जगताप हे करत आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chinchwad Assembly Constituency | चिंचवड विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढल्याने भाजपची डोकेदुखी वाढणार; शत्रुघ्न काटेंचे शक्तिप्रदर्शन

Pune Monsoon Rain | पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट; पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

Yerawada Jail News | येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी फरार