Pune Crime News | पुण्याच्या ग्रामीण भागात ड्रोनची दहशत! ज्या परिसरात ड्रोन फिरले त्याच परिसरात चोरी, काळुबाई मंदिरातून देवीच्या दागिन्यांची चोरी
मंचर/पुणे : Manchar Pune Crime News | पुणे ग्रामीण भागात रात्रीच्यावेळी आकाश फिरणाऱ्या ड्रोनची दहशत पसरली आहे. अलकीडच्या काही दिवसात ड्रोन ज्या परिसरात फिरले त्याच परिसरात चोरीच्या घटना घडल्या आहेत. आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी येथील काळूबाई मंदिरातून देवीच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना गुरुवारी (दि.11) सकाळी उघडकीस आली आहे. मागील दोन आठवड्यापूर्वी काळूबाई मंदिर (Theft In Kalubai Mandir) परिसरात ड्रोनने घिरट्या घातल्या होत्या.
आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी येथील काळूबाई मंदिरात गुरुवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा तोडला व देवीच्या अंगावरील दीड तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व 40 हजार रुपये किमतीचे सांऊंड सिस्टिम मशिन असा एकूण दीड लाखांचा ऐवज चोरुन नेला आहे. पोंदेवाडी येथील रोडेवाडी येथे सविंदणे पोंदेवाडी शिवे वर काळूबाई मंदिर आहे. सकाळी साडेसात वाजता मंदिराचे पुजारी किसन नरवडे व गायकवाड बाबा पूजा करण्यासाठी मंदिरात आले.
पुजारी मंदिरात आले असता दरवाजाचा कडी कोयंडा तोडून दरवाजा उघडलेला आढळला. याबाबत नरवडे यांनी नितीन नरवडे यांना फोन करुन माहिती दिली. खरेदी विक्री संघांचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, माजी उपसरपंच संदीप पोखरकर, अमोल वाळुंज, सोमनाथ वाळुंज, बाळासाहेब कोरके, सुनील नरवडे, आबा नरवडे यांनी मंदिराला भेट देऊन पाहणी केली. लोखंडी खुटीने दरवाजाची कडी उचकटून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून देवीच्या अंगावरील दीड तोळे सोन्यासह सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेल्याबाबत पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात माहिती दिल्याचे संदीप पोखरकर यांनी सांगितले.
ड्रोन बाबत गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे – खा. कोल्हे
पुणे ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी आकाशात ड्रोन घिरट्या घालत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
वारंवार चौकशीची मागणी करूनही समर्पक उत्तर दिली जात नाहीत.
याबाबत मी पत्र दिले होते. प्रशासनाने याबाबत अद्याप गांभीर्याने घेतले नाही.
जिल्हा पोलीस अधीक्षकांशी बोललो असता त्यांच्याकडून कारवाई करू असे उत्तर येत आहे.
ग्रामीण भागात अनोळखी ड्रोनमुळे भयाण वातावरण निर्माण झाले असून,
सदर ड्रोन कशासाठी वापरले जातात याचे निवेदन व स्पष्टीकरण गृहमंत्र्यांनी विधानसभेत द्यावे,
अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड