Pune Crime News । हॉटेल चालकाच्या मुलाच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या फरार गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने केले जेरबंद
पुणे : Pune Crime News । चायनीज हॉटेलचालकाच्या मुलावर तलवारीने वार करुन गल्ल्यातील पैसे जबरदस्तीने चोरुन नेल्याप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा येरवडा पोलीस ठाण्यात दाखल होता. गेली १५ महिने फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने जेरबंद केले.
फैसल उर्फ बटाव उस्मान खान Faisal alias Batav Usman Khan (वय ४२, रा. चुडामण तालमीजवळ, भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
येरवडा भागातील एका चायनीज खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या उपाहारगृह चालकाच्या मुलावर खान याने तीक्ष्ण शस्त्राने वार करुन गल्ल्यातील रोकड लुटली होती. या प्रकरणी दीड वर्षांपूर्वी त्याच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर पसार झाला होता. तेव्हा पासून त्याचा शोध घेण्यात येत होता.
गुन्हे शाखेच्या युनिट ४ चे पथक गुन्हेगार चेक करीत असताना २५ फेब्रुवारी रोजी पोलीस अंमलदार नागेश कुंवर आणि विशाल इथापे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, खुनाचा प्रयत्न केलेल्या गुन्ह्यातील आरोपींपैकी एक जण कासेवाडी येथील भगवा चौक येथे थांबला आहे. या बातमीवरुन पोलिसांनी फैसल खान याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने पक्को चायनीज हॉटेलच्या काऊंटरवर असलेल्या इसमास तलवारीने मारहाण करुन हॉटेलच्या गल्ल्यातील रक्कम जबरदस्तीने काढून घेऊन पळून गेलो होतो. २०२४ मध्ये येरवडा पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होता. पुढील कारवाईसाठी त्याला येरवडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, पोलीस पनिरीक्षक वैभव मगदुम, सहायक पोलीस फौजदार एकनाथ जोशी, पोलीस अंमलदार अमजद शेख, तुषार खराडे,नागेश सिंग कुंवर, विशल इथापे, शरद झांजरे यांनी केली आहे़
