Pune Crime News | अंडाभुर्जी चालकावर कोयत्याने वार करुन खुनाचा प्रयत्न करणार्‍या गुंडाला गुन्हे शाखेच्या युनिट 2 च्या पथकाने सहा महिन्यानंतर केले जेरबंद

Pune Crime News | The goon who attempted to murder a driver of Andabhurji by stabbing him with a sickle was arrested by the Crime Branch Unit 2 team after six months

पुणे : Pune Crime News | अंडाभुर्जी चालकाबरोबर झालेल्या भांडणात टोळक्याने कोयत्याने वार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केला होता. या गुन्ह्यात गेली ६ महिने फरार असलेल्या गुंडाला गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने जेरबंद केले.

राजसिंग युवराजसिंग जुनी Raj Singh Yuvraj Singh Juni (वय २८, रा. पाटील इस्टेट, मुंबई-पुणे रस्ता, शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

या घटनेत आबा राधाकिशन सरोदे (वय ३९, रा. डायस प्लॉट कॅनॉललगत, गुलटेकडी) हे गंभीर जखमी झाले होते. ही घटना २० सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजता घडली होती. आबा सरोदे यांनी आपले भंगार दुकान बंद करुन त्या जागी अंडाभुर्जीची गाडी टाकली होती. गोंविदसिंग टाक व भक्तीसिंग दुधानी यांच्याबरोबर अंडाभुर्जीचे पैसे देण्यावरुन आदल्या दिवशी वाद झाला होता. या कारणावरुन भक्तीसिंग दुधानी याने सरोदे यांना म्हणाला की, तु काय शेठ झाला का, आबा सरोदे याला आज जिवंत सोडायचे नाही, असे म्हणून सर्वांनी हाताने मारहाण करुन कोयत्याने सपासप वार करुन त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी भक्तीसिंग दुधानी, शक्तीसिंग दुधानी, गोविंदसिंग टाक, आकाशसिंग दुधानी, बॉबी, राज आणि जग्गी यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून राज जुनी हा फरार होता.

गुन्हे शाखेच्या युनिट २ कडील पोलीस अंमलदार अजीम शेख व विशाल दळवी यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की, राज जुनी हा शिवाजीनगर पाटील इस्टेट भागात आलेला आहे. बातमीनुसार, पोलिसांनी पाटील इस्टेट परिसरात सापळा रचून राजसिंग जुनी याला पकडले. खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याबाबत खात्री करुन पुढील कारवाईकरीता स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात दिले.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस अंमलदार सद्दाम तांबोळी, अजीम शेख, विशाल दळवी, नागनाथ राख, शंकर नेवसे, उज्वल मोकाशी, विनोद चव्हाण, शंकर कुंभार, ओमकार कुंभार, विशाल दळवी, विनायक वगारे, साधना ताम्हाणे यांनी केली आहे.

You may have missed