Pune Crime News | घरफोड्या करणार्या सराईताला पकडून साडेचार लाखांचा ऐवज हस्तगत
पुणे : Pune Crime News | घरफोड्या करणार्या सराईत पितापुत्रामधील एकाला पकडून फरासखाना पोलिसांनी (Faraskhana Police Station) ४ लाख ५७ हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. फैय्याज राज मोहम्मद शेख (रा. सत्यानंद नगर, मिठानगर, कोंढवा – Mitha Nagar Kondhwa) असे अटक केलेल्याचे नाव आहे. (Arrest In House Burglary)
फरासखाना पोलीस ठाण्यातील हद्दीत ३ नोव्हेबर रोजी दिवसा घरफोडी झाली होती. फरासखाना पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी तपास पथकातील अधिकारी वैभव गायकवाड व अरविंद शिंदे यांना मार्गदर्शन करुन तपास करण्यास सांगितले होते. पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात आरोपीने वापरलेल्या गाडीचा माग काढला. तसेच तांत्रिक विश्लेषणात हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार रय्यान ऊर्फ फईम शेख तसचे त्याचे वडिल या दोघांनी लाल रंगाची बर्गमॅन गाडीवर येऊन केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.
पोलीस अंमलदार प्रविण पासलकर, गजानन सोनुने व महेश राठोड यांना मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी फैय्याज शेख याला अटक केली. चौकशीत त्याच्याकडून ३६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ५०० ग्रॅम वजनाची चांदीच वीट, १०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, ५५ हजार रुपये रोख, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, कटावणी असा सर्व मिळून ४ लाख ५७ हजार २०० रुपयांचा माल जप्त केला आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल,
सहायक पोलीस आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, गुन्हे निरीक्षक अजित जाधव, सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे, सहायक फौजदार मेहबुब मोकाशी, पोलीस अंमलदार प्रविण पासलकर, गजानन सोनुने, महेश राठोड, वैभव स्वामी, तानाजी नांगरे, नितीन तेलंगे, संदिप कांबळे, विशाल शिंदे, किशोर शिंदे, नितीन जाधव, अर्जुन कुडाळकर, समीर माळवदकर, सुमित खुट्टे, महेश पवार, शशिकांत ननावरे, चेतन होळकर यांनी केली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police Tadipari Action | येरवडा परिसरातील 4 सराईत गुन्हेगार तडीपार ! पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केली कारवाई
Maharashtra Assembly Election 2024 | दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींच्या ठिकाणी वाहन तळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध