Pune Crime News | खोपोलीतील शिवसेना नगरसेविकेचे पती मंगेश काळोखे हत्या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 5 च्या पथकाने केले जेरबंद

Pune Crime News | The second accused in the murder case of Shiv Sena corporator's husband Mangesh Kalokhe in Khopoli has been arrested by a team of Pune Police's Crime Branch Unit 5.

पुणे : Pune Crime News | खोपोली येथील शिवसेना नगरसेविका यांचे पती मंगेश काळोखे यांचा सुपारी घेऊन हत्या केल्या प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील युनिट ५ च्या पथकाने दुसर्‍या आरोपीला जेरबंद केले आहे.

अरबाज ऊर्फ अरमान अल्लुद्दीन शेख Arbaaz alias Armaan Alluddin Shaikh (वय २६, रा. आदर्शनगर, ऊरुळी देवाची) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. यापूर्वी वानवडी पोलिसांनी या हत्याकांडातील खालिद खलील कुरेशी Khalid Khalil Qureshi (वय २३, रा. सय्यदनगर) याला पकडले होते. राजकीय वैमनस्यातून सुपारी देऊन ही हत्या करण्यात आली होती. मंगेश काळोखे यांच्या हत्येसाठी कुरेशी याने २० लाख रुपयांची सुपारी कुरेशी याने दोन मित्रांच्या मदतीने ही हत्या केली होती.

रामटेकडी परिसरात एका महिलेला काही जणांनी लुबाडले होते. सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने वानवडी पोलिसांनी दोघांना पकडले होते. त्यांनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी खालिद कुरेशी याला पकडले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने इतर दोघांच्या मदतीने सुपारी घेऊन मंगेश काळोखे यांची हत्या केली होती.

काळेपडळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यात अरबाज शेख याचा पोलीस शोध घेत होते. यावेळी पोलीस अंमलदार नासीर देशमुख यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अरबाज शेख हा आळंदी भागामध्ये येणार आहे. त्यानुसार त्याचा पोलीस पथक शोध घेत असताना विश्रांतवाडी पीएमपी बसस्टॉप येथे तो पोलिसांना मिळाला. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने खोपोली येथील मंगेश काळोखे यांच्या हत्येमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली. खोपोली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छगन कापसे, पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार, पोलीस अंमलदार नासीर देशमुख, तानाजी देशमुख, प्रशांत कर्णवर, अमर चव्हाण, गणेश माने आणि परमेश्वर कदम यांनी केली आहे.

You may have missed