Pune Crime News | सिक्युरिटी अलार्म वाजला आणि एटीएममध्ये छेडछाड करणारा चोरटा सापडला ! सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांनी चोरट्याला पकडले

Arrest

पुणे : Pune Crime News | व्यापार्‍याने एटीएममधून पैसे काढले. पैसे मोजले जात असल्याचा आवाजही आला. पैसे काढल्याचा मेसेजही मोबाईलवर आला. पण, एटीएममधून (ATM Center) पैसे मिळाले नाही. तेव्हा व्यापार्‍याने आपल्या मुलीला तेथे थांबवून बँकेत तक्रार करायला गेले. इकडे दोघे जण आत शिरले व पैसे काढू लागले. त्याचवेळी सिक्युरिटी अलार्म वाजला. तो ऐकून सुरक्षा रक्षक व रोडवरील वाहतूक पोलीस तिकडे धावले. हे पाहून त्यांच्यातील एक जण पळून गेला. पोलिसांनी दुसर्‍याला पकडले. (Arrest In Theft Case)

संतोष ब्रिजेश कुमार (वय २४, सध्या रा. चिखली, मुळ रा. प्रतापगढ) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत राजेश महेंद्रलाल शहा (वय ५३, रा. सदाशिव पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police) फिर्याद दिली आहे. हा प्रकार केळकर रोडवरील कासट बंगल्याजवळील कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये शुक्रवारी दुपारी दीड ते अडीच दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यापारी असून ते कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये गेले. त्यांनी पैसे काढण्यासाठी कार्ड टाकले. १० हजार रुपये काढण्यासाठी एन्ट्री केली. त्यानंतर एटीएम मशीनमधून पैसे मोजले जात असल्याचा आवाजही आला. त्यांना मोबाईलवर मेसेजही आला. परंतु पैसे बाहेर आले नाहीत. त्यांनी कार्ड बाहेर काढले. आपल्या मुलीला बोलावून घेतले. तिला सांगितले तू इथे थांब. मी बँकेत तक्रार करुन येतो. ते बँकेत गेले असतानाच मुलीचा फोन आला. ती काय घडले ते सांगितले.

फिर्यादी बाहेर गेल्यानंतर दोघे जण आत शिरले. त्यांनी पैसे काढण्याच्या ठिकाणी पट्टी लावली होती. त्यामुळे फिर्यादी यांचे पैसे अडकले होते. ते पैसे ते दोघे जण काढत असताना एटीएममध्ये काहीतरी बदल करत असल्याने सिक्युरिटी अलार्म वाजण्यास सुरुवात झाली. त्याबरोबर सुरक्षा रक्षक व रोडवरील वाहतूक पोलीस तिकडे धावले. अलार्म वाजल्याने घाबरुन दोघे जण बाहेर येऊन पळून जाण्याचा प्रयत्न करु लागले. सुरक्षारक्षक व वाहतूक पोलिसांनी संतोष कुमार याला पकडले.

तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मोरे यांनी सांगितले की, संतोष कुमार व त्याचा साथीदार या दोघांनी हे कृत्य केले आहे.
संतोषकुमारचे बी. ए. पर्यंत शिक्षण झाले आहे. सध्या तो चिखली येथे राहतो.
एटीएममध्ये धातूची पट्टी लावण्याचे काम आपल्या साथीदाराने केले असून आपण त्याच्या बरोबर होतो,
असे तो सांगत आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kothrud Assembly Election 2024 | चंद्रकांतदादांमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना मोफत उच्च शिक्षणाची संधी मिळाली;
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे प्रतिपादन

Hadapsar Assembly Election 2024 | महाराष्ट्राची अधोगती करणाऱ्यांना घरी बसवायचेय; जयंत पाटील यांचे प्रतिपादन (Video)

Bibvewadi Pune Crime News | चार महिन्यांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगार बिबवेवाडी पोलिसांच्या जाळ्यात

You may have missed