Pune Crime News | दोघा मॅनेजरांनी ट्रॅव्हल कंपनीला घातला 1 कोटी 35 लाखांना गंडा; परदेशात टूर पाठवून पैसे घेतले स्वत:च्या खात्यात

पुणे : Pune Pimpri Chinchwad Crime News | परदेशात टूर आयोजित करुन कंपनीचे बनावट स्टॅप, लेटर हेड तयार करुन त्याद्वारे स्वत:च्या खात्यात पैसे घेऊन ट्रॅव्हल कंपनीची तब्बल १ कोटी ३५ लाख ९५ हजार ६८६ रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) करण्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत कुणाल नितीन पाटील (वय ३४, रा. सहकारनगर) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विपुल नवगिरे Vipul Navgire (वय ३०, रा. टिंगरेनगर, लोहगाव) आणि पंकज मेळै Pankaj Melai (वय ३८, रा. मोशी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बँकॉक, व्हिएतनाम तसेच औंध येथील फ्युचर टॉवर येथील कंपनीच्या कार्यालयात २०२१ पासून २ मे २०२४ दरम्यान घडला आहे. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची ट्रॅव्हल कंपनी देशापरदेशात टूर आयोजित करते.
आरोपी विपुल नवगिरे व पंकज मेळे हे फिर्यादीच्या टॅव्हल कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होते.
त्यांनी कंपनीचा विश्वास संपादन करुन कंपनीचे नावे बनावट स्टॅप, लेटर हेड तयार करुन घेतले.
ते खरे असल्याचे भासवून त्यांना अधिकार नसताना त्यावर सह्या केल्या.
ते ग्राहकांना दाखवून त्यांच्याकडून स्वत:चे बँक खात्यात रक्कमा स्विकारल्या. तसेच बँकॉक व व्हिएतनाम येथे टुर गेल्या असताना तेथे ग्राहकांकडून त्यांनी पैसे घेतल्याचे आढळून आले. कंपनीकडे तक्रारी आल्यानंतर चौकशीत या दोघांनी गेल्या चार वर्षात तब्बल १ कोटी ३५ लाख ९५ हजार ६८६ रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले. त्यानंतर आता चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे अधिक तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Rains | पुण्यात पावसाचा हाहाकार! सोसायट्यांमध्ये छातीपर्यंत पाणी; NDRF चे पथक मदतीसाठी दाखल
Lavasa Landslide | लवासामध्ये दरड कोसळल्याने 2 व्हिला गाडले गेले; तीन ते चार जण बेपत्ता
Pune Rainfall Update | पुणेकरांसाठी आणखी धोक्याची घंटा; हवामान विभागाकडून इशारा; रेड अलर्ट जारी