Pune Crime News | चाकूचा धाक दाखवून तरुणाला लुबाडले ! 16 लाखांची क्रिप्टोकरन्सी घेतली ट्रान्सफर करुन, दरोड्याचा गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | स्टॉक मार्केटच्या कोर्सची (Stock Market Course) माहिती घेण्याच्या बहाण्याने गाडीतून नेऊन सात जणांनी तरुणाला चाकूचा धाक दाखवून लुबाडले. जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडील १६ लाख रुपयांचे क्रिप्टो करन्सी ट्रान्सफर (Cryptocurrency) करुन घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी (Chaturshringi Police Station) दरोड्याचा गुन्हा दाखल (Robbery Case) केला आहे.
याबाबत उमेश त्र्यंबकेश्वर हेडात (वय २६, रा. ड्रीम रिधम सोसायटी, बावधन) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ६४२/२४) दिली आहे. त्यानुसार मयुर कैलाश अमोदकर Mayur Kailash Amodkar (रा. जळगाव) व सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बालेवाडी येथील हाय स्ट्रीटवरील थर्ड वेव्ह कॅफे समोरुन ते शिक्रापूर (Shikrapur) दरम्यान २२ ते २४ जुलै दरम्यान घडला आहे. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश हेडात हे स्टॉक मार्केटबाबत मार्गदर्शन करतात. मयुर अमोदकर व त्याचे साथीदारांनी स्टॉक मार्केटबाबतच्या कोर्सची माहिती घेण्याचा बहाणा केला. त्यांच्याकडील इनोव्हा गाडीमध्ये बसण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना चाकूचा धाक दाखवून शिक्रापूर येथे नेले. फिर्यादीचे तोंड दाबून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून घेऊन पासवर्ड सांगण्यास जबरदस्ती केली.
फिर्यादीच्या मोबाईलमधील बायनान्स एक्सचेंज अॅप्लीकेशनमधून १६ लाख २ हजार ५१० रुपयांचे १७.६१०.०४२२८५ युएसडीटी क्रिप्टोकरन्सी जबरदस्तीने ट्रान्सफर करुन घेतले.
त्यांना वाटेत सोडून ते चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक चौगुले तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Rains | पुण्यात पावसाचा हाहाकार! सोसायट्यांमध्ये छातीपर्यंत पाणी; NDRF चे पथक मदतीसाठी दाखल
Lavasa Landslide | लवासामध्ये दरड कोसळल्याने 2 व्हिला गाडले गेले; तीन ते चार जण बेपत्ता
Pune Rainfall Update | पुणेकरांसाठी आणखी धोक्याची घंटा; हवामान विभागाकडून इशारा; रेड अलर्ट जारी