Pune Crime News | संत तुकाराम पादुका मंदिराची दानपेटी नेली चोरुन

Chori (1)

पुणे : Pune Crime News | फर्ग्युसन रोडवरील (FC Road Pune) संत तुकाराम पादुका मंदिराच्या (Sant Tukaram Paduka Temple) दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने दानपेटी आतील रक्कमेसह चोरुन नेण्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत ट्रस्टी रमेश प्रतापराव शिरोळे (वय ६३, रा. परिसीमा सोसायटी, शिरोळे रोड) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना २७ जुलै रात्री आठ वाजण्यापासून २८ जुलै रोजी पहाटे पावणेसहा वाजण्याच्या दरमयान घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संत तुकाराम महाराज पादुका मंदिर बंद असताना चोरट्याने दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. मंदिरातील दानपेटी व त्यात असलेली रोख रक्कम असा ८ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. मंदिराचे दार उघडले असल्याचे सकाळी लक्षात आल्यानंतर चोरीचा हा प्रकार समोर आला. पोलीस अंमलदार गभाले तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar On Majhi Ladki Bahin Yojana | शरद पवारांची ‘लाडकी बहीण’ योजनेवर शंका,
”प्रत्यक्ष निवडणूक जाहीर होण्याआधी एखाद-दुसरा हप्ता देण्याचा…”

Puja Khedkar Case | पूजा खेडकर गायब? पुणे पोलिसांनी 3 वेळा नोटीस बजावून देखील गैरहजर, दिल्ली पोलिसही शोधात

Kondhwa Pune Crime News | सॉफ्टवेअर इंजिनिअरला शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने
41 लाखांची फसवणूक

Uran Raigad Crime News | तरुणीची निर्घृण हत्या, चेहऱ्याचा चेंदामेंदा आणि छिन्नविच्छिन्न मृतदेह
आढळल्याने खळबळ, प्रेमप्रकरणातून खून झाल्याचा संशय

Hadapsar Pune Crime News | फोन पे अ‍ॅक्टिव्हेट करण्याच्या बहाण्याने 5 लाख 22 हजारांचा गंडा; गुुगलवरुन बँकेचा नंबर शोधणे पडले महागात

You may have missed