Pune Crime News | कबुतर चोरीसाठी आलेल्या चोरट्याचा मारहाणीत मृत्यु; वैदुवाडीतील पहाटेची घटना

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  वानवडी परिसरातील वैदुवाडी येथे कबुतर चोरीसाठी आल्याच्या संशयावरुन तरुणाला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यु झाला. वानवडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

रुपेश शिंदे (वय १९, रा. मुळशी) असे मृत्यु झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, रुपेश शिंदे हा मुळचा मुळशी येथील राहणारा आहे. वैदुवाडी येथील शंकर महाराज मठाजवळ पहाटे साडेपाच वाजता ही घटना घडली. पहाटेच्या सुमारास रुपेश शिंदे हा तेथे आला होता. तो कबुतर चोरण्यासाठी आल्याच्या संशयावरुन काही जणांनी त्याला पकडले. यावेळी झालेल्या वादावादीत त्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्यात जबर जखमी झालेल्या रुपेश शिंदे याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु असताना बुधवारी सकाळी सव्वा दहा वाजता त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

वानवडी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. रुपेश शिंदे यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असून त्यानंतर काही बाबी स्पष्ट होऊ शकेल, असे पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी सांगितले.

You may have missed