Pune Crime News | पुण्यातील उच्चभ्रु सोसायटीमधील 15 वर्षाच्या गतीमंद मुलीवर ओळखीच्याच तिघांनी केले लैंगिक अत्याचार; भारती विद्यापीठ पोलिसांनी तिघांना केली अटक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | पुण्यातील उच्चभ्रु सोसायटीमधील एका १५ वर्षाच्या गतीमंद मुलीवर तिच्या ओळखीच्या तिघांनी वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही मुलगी कोणाशी मोबाईलवर बोलते, हे वडिलांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तिच्याकडे चौकशी केली, त्यातून हा प्रकार समोर आला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी या तिघा नराधमांना अटक केली आहे.

या घटनेने एकच खळबळ उडाली असून बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी १५ वर्षाची असून गतीमंद आहे. जानेवारी २०२६ मध्ये नागेश, गौरव आणि आशुतोष यांनी ही मुलगी गतीमंद आहे, हे माहिती असताना एका उच्चभ्रु सोसायटीतील क्लब हाऊसच्या स्वच्छतागृहामध्ये नेले. तेथे तिच्यावर सामुहिक लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. त्यांच्या बिल्डिंगच्या पाठीमागे असलेल्या बंद गाळ्यामध्ये नेऊनही तिच्यावर अत्याचार केले आहेत. प्रेम या मुलाने पिडित मुलीला व्हिडिओ कॉल करुन तिला शर्टवर करण्यास सांगितले. याची माहिती मिळताच तिच्या वडिलांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे तपास करीत आहेत.

You may have missed