Pune Crime News | हातउसने दिलेल्या पैशांवरुन पिस्तुल रोखून मारहाण करुन खुनाचा प्रयत्न करणार्‍या तिघांना गुन्हे शाखेच्या युनिट 2 च्या पथकाने केले जेरबंद

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | हात उसने दिलेले पैसे मागितल्याच्या रागातून टोळक्याने कोयत्याने वार करुन पिस्तुल रोखून मारहाण करुन खुनाचा प्रयत्न केलेल्या टोळक्यातील तिघा जणांना गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने जेरबंद केले.

रेहान उर्फ खिमा फिरोज शेख Rehan alias Khima Feroz Shaikh (वय २०), गौरव गणेश गुजर Gaurav Ganesh Gujar (वय २०), अतिक हारून अत्तार Atik Haroon Attar (वय २१, तिघे रा. काशेवाडी, भवानी पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे.  याबाबत कानिफनाथ विष्णु नायडु (वय ५९, रा. काशेवाडी, भवानी पेठ) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना शंकरशेट रोडवरील धोबी घाट स्मशानभूमी येथील काली मंदिराजवळ ३ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली आहे.

फिर्यादी व त्यांचे भाचे नमन आणि विल्सन ठाकूर यांच्यासह काली मंदिरात दर्शनासाठी गेले होते. तेथे अजिम सलीम शेख (वय २७, रा. काशेवाडी, भवानी पेठ) हा थांबला होता. फिर्यादी यांनी उसने दिलेले पैसे मागितले, त्याचा राग मनात धरुन अजिम व त्याच्या साथीदारांनी कानिफनाथ नायडु यांना लोखंडी पिस्तुलाने डोक्यात मारले. हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. त्यांचा वाचविण्यासाठी नमन व विल्सन ठाकूर हे मध्ये पडले असता त्यांच्यावर पिस्तुल रोखून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांना हाताने मारहाण केली.

या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार सद्दाम तांबोळी व अजीम शेख यांना बातमी मिळाली. त्यानुसार मार्केटयार्ड येथून रेहान शेख व गौरव गुजर यांना ४ एप्रिल रोजी ताब्यात घेतले.  १० एप्रिल रोजी अतिक हारुन अत्तार याला अटक करण्यात आली. खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील ३ आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने पकडून स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात दिले.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस अंमलदार सद्दाम तांबोळी, अजीम शेख,  शंकर नेवसे, साधना ताम्हाणे, नागनाथ राख, उज्ज्वल मोकाशी, शंकर कुंभार, विशाल दळवी, विनोद चव्हाण, संजय सरगर संतोष टकले, ऋषिकेश व्यवहारे, शिवानंद कायगुडे, विजयकुमार पवार, संदिप शिर्के ओमकार कुंभार, संजय अबनावे, विनायक वगारे यांनी केली.

You may have missed