Pune Crime News | मित्राच्या नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी मोफत गौर्या, लाकडे दिल्याने विद्युत स्मशानभूमीतील कामगाराला सत्तूरने मारहाण करणार्या व्यावसायिकासह तिघांना अटक
पुणे : Pune Crime News | मित्राच्या नातेवाईकाला अंत्यसंस्कारासाठी गौर्या व लाकडे मोफत दिल्याच्या रागातून पाषाण व सुतारवाडी स्मशानभूमीत गौर्या, लाकडाचे ट्रेंडर मिळालेल्या व्यावसायिकाने विद्युत स्मशानभूमीत काम करणार्या कामगारावर सत्तूरने वार करुन गंभीर जखमी केले. बाणेर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
याबाबत सचिन उत्तम रणपिसे (वय ३५, रा. विठ्ठल मंदिराजवळ, सुतारवाडी, पाषाण) यांनी बाणेर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अजय अशोक माकर Ajay Ashok Makar (वय २५, रा. वेधांत सोसायटी, नलवडे वस्ती, सुतारवाडी रोड, पाषाण), अतिश मारुती चव्हाण Atish Maruti Chavan (वय २७, रा. वासुदेव निम्हण चाळ, पाषाण स्मशानभूमी, पाषाण), रामु नर्सराज मुप्पाला Ramu Narsaraj Muppala (वय ३२, रा. ए आरडी कॉलनी कर्नल पाईट, पाषाण) यांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना ४ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. ही घटना पाषाण येथील शिवशक्ती चौकाजवळील बालन सुतार यांचे कार्यालयासमोर ११ मार्च रोजी रात्री पावणे बारा वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन रणपिसे हे औंध स्मशानभूमी येथे स्मशान ऑपरेटर म्हणून काम करतात. अजय माकर याला सुतारवाडी, पाषाण येथील स्मशानभूमीत गौर्या व लाकडे पुरविण्याचे टेंडर मिळाले आहे. सचिन रणपिसे यांचा मित्र रोहित आडुळकर याच्या चुलत्यांचे निधन झाले होते. त्यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने सचिन रणपिसे यांनी त्यांच्याकडे असलेल्या गाईच्या शेणाच्या गौर्या व लाकडे अंत्यविधीसाठी पैसे न घेता दिले होते. त्यांचे अंत्यविधीसाठी सुतारवाडी स्मशान भूमीत ते हजर होते. तेथून ते ११ मार्च रोजी रात्री साडेअकरा वाजता घरी परत आले. त्यावेळी अजय माकर याने फोन करुन सुतारवाडी विठ्ठल मंदिराजवळ बोलावले.
सचिन रणपिसे तेथे गेले असताना माकर याने गाडी थांबवली. सचिन रणपिसे यांना म्हणाला की, तु मयतीसाठी लाकडे आणि गौर्या फुकट का दिल्या. त्या माझ्याकडून का घ्यायला लावले नाहीत, असे म्हणून शिवीगाळ करु लागला. तेव्हा त्यांनी शिव्या देऊ नकोस, असे म्हणताच गाडीत पाठीमागे बसलेल्या एकाने खाली उतरुन सचिन रणपिसे यांना बाहेर खेचले. हाताने मारहाण करुन लागला. अजय माकर हा सत्तूर घेऊन बाहेर आला व त्याने तू लई जहागीरदार लागून गेला, असे बोलत सत्तूरने त्यांच्या उजव्या खांद्यावर वार केला. दुसर्या खांद्यावर वार करुन जखमी केले. तिसर्याने त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. तेव्हा ते जीव वाचवून पळून आले. बाणेर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक बालाजी सानप तपास करीत आहेत.
