Pune Crime News | ‘तुला हाताची नस कापायला सांगितले होते, गळ्याची नस कापायला सांगितले होते, तेही तू केलं नाहीस’; प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय, पर्वती पोलिसांनी भावा-बहिणीवर केला गुन्हा दाखल

Pune Crime News |Tired of his girlfriend’s harassment, the young man took an extreme decision, Parvati police registered a case against the brother and sister

पुणे : Pune Crime News | ‘‘तुला हातची नस कापायला सांगितली होती, ते तु केलं नाहीस, गळ्याची नस कापायला सांगितली होती, तेही तू केलं नाहीस’’ असे मेसेज करणार्‍या प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने टोकाचा निर्णय घेतला. पर्वती पोलिसांनी भावा बहिणीवर गुन्हा दाखल केला आहे.

आदिल हुसेन पठाण (वय २२, रा. दत्तवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याची आई शमा हुसेन पठाण (वय ४६, रा. दत्तवाडी) यांनी पर्वती पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सुप्रिया सुरज गायकवाड आणि तेजस कांबळे (दोघे रा. दत्तवाडी, साईबाबा मंदिराजवळ) या भावाबहिणीवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २८ डिसेंबर २०२५ रोजी घडली होती.

आदिल पठाण याने त्याचे नातेवाईक समीर पठाण यांना २६ डिसेंबर रोजी कोंढवा येथे भेटून त्यांच्या गल्लीतील महिला सुप्रिया गायकवाड हिच्याशी प्रेमसंबंध असून ती त्यास ब्लॅकमेल करत आहे. सुप्रिया गायकवाड व तिचा भाऊ तेजस कांबळे हे त्याला खोट्या केसेसमध्ये अडकविण्याची धमकी देत आहे, असे सांगितले होते. त्यावेळी समीर यांनी अदिलला निवडणुक झाल्यानंतर आपण चर्चा करु, असे सांगितले होते.

आदिलच्या मृत्युनंतर २६ जानेवारी रोजी त्याची रुम आवरत असताना आदिलच्या कपाटामध्ये नाकोडा व साखरीया ज्वेलर्सच्या दागिने खरेदी केलेल्या पावत्या मिळाल्या. त्या तेजस कांबळे याच्या नावावर होत्या. याबाबत तेजस कांबळे याला विचारणा केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर आदिलचा मोबाईल चेक केला असता त्यामध्ये सुप्रिया गायकवाड, तेजस कांबळे यांच्या सोबत झालेले बरेच व्हॉट्सअ‍ॅप चे मेसेज, कॉलिंग, स्नॅपचॅटवरील मेसेज फिर्यादी यांनी वाचले.

या मेसेजवरुन आदिल व सुप्रिया यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते, याची त्यांना खात्री झाली. सुप्रिया गायकवाड हिने आदिलला केलेल्या मेसेजमध्ये ती आदिलला वारंवार अश्लिल भाषेत शिवीगाळ करुन, खोट्या केसेसच्या धमक्या देऊन त्याला जीवन संपवून टाकण्यासाठी प्रवृत्त करणारे मेसेज करत होती. त्याच्याकडून सोने, महागड्या वस्तू व पैसे घेतल्याचे दिसून आले. ती वारंवार आदिलला ‘‘तुला आणि तुझ्या बापाला कसे लटकवते, तुझा बाप तिथेच फाशी घेणार, तुझ्यावर ते दिवस लवकर येणार, मी तुझ्या व तुझ्या बापाच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवणार व तुम्हाला फाशीला पाठवणार, फाशी घेण्यासाठी दम लागतो, तुला मी हाताची नस कापायला सांगितली होती. ते तु केलं नाहीस, गळ्याची नस कापायला सांगितली होती, तेही तु केलं नाहीस’’, अशा प्रकारचे भरपूर मेसेज सुप्रियाने आदिलला पाठविलेले आहेत.

यापूर्वी आदिलने १८ ऑक्टोंबर २०२५ रोजी तसेच २३ डिसेंबर २०२५ रोजी देखील गळफास घेऊन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला होता. हे आदिलने त्याच्या स्नॅपचॅट आयडीवरुन सुप्रियाला तिच्या स्नॅपचॅट आयडी वर पाठवलेल्या स्नॅपचॅटवरील फोटोवरुन फिर्यादीला समजले. २८ डिसेंबर २०२५ रोजी आपले जीवन संपविण्यापूर्वी आदिलने तेजस कांबळे यास व्हिडिओ कॉल केलेला होता. सुप्रिया गायकवाड हिच्यासोबत स्नॅपचॅटवर बोलणे झालेले त्यांना दिसून आले. सुप्रिया गायकवाड व तेजस कांबळे हे सतत पैशासाठी आदिल याला ब्लॅकमेल करुन त्याला सतत खोट्या केसेसच्या धमक्या देऊन त्याला मानसिक त्रास देत होते. त्या त्रासाला कंटाळून त्याने आपले जीवन संपविले. पोलीस उपनिरीक्षक वानखेड तपास करीत आहेत.

You may have missed