Pune Crime News | सुधीर गवस खुनाचा बदला घेण्यासाठी खूनाचा प्रयत्न करुन फरार झालेला गुंड जेरबंद (Video)
पुणे : Pune Crime News | कुख्यात गुन्हेगार सुधीर गवस (Sudhir Gavas Murder) याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी तरुणावर वार करुन त्याच्या खूनाचा प्रयत्न करणारा (Attempt To Murder) गुंड तब्बल एक महिन्यानंतर पोलिसांच्या हाती लागला. चतु:श्रृंगी पोलिसांनी (Chaturshringi Police Station) या फरार गुंडाला जेरबंद केले आहे.
https://www.instagram.com/reel/C_e4GIbJGhJ/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
रोहित ऊर्फ भोर्या मधुकर शिंदे (वय २१, रा. उरळी कांचन) असे या गुंडाचे नाव आहे. याप्रकरणी प्रविण कांबळे (वय ३६, रा. जयप्रकाशनगर, येरवडा) यांनी फिर्याद दिली होती. ५ ऑगस्ट रोजी ते मध्यरात्री १ वाजता शतपावली करीत असताना काही गुंड आले. त्यांनी रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली. आमच्या भाईचा बदला आम्ही घेणारच, आमचा भाई गेला आता जो कोणी मध्ये येईल, त्याला आम्ही संपवून टाकणार, असे म्हणून त्यांनी कोयत्याने फिर्यादीवर वार करुन त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला होता.
या प्रकरणातील काही जणांना येरवडा पोलिसांनी अटक केली. त्यांची जयप्रकाशनगर परिसरातून धिंडही काढण्यात आली होती. तेव्हापासून रोहित शिंदे हा फरार होता. चतु: श्रृंगी पोलीस ठाण्याचे तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील (API Narendra Patil) यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की, खूनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी सोमेश्वरवाडी (Someshwarwadi Pune) येथे आला आहे. पोलिसांनी तातडीने तेथे जाऊन रोहित ऊर्फ भोर्या शिंदे याला ताब्यात घेतले. रोहित शिंदे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, खंडणी, गंभीर दुखापत असे गुन्हे दाखल आहेत. अधिक तपासासाठी त्याला येरवडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar), सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील (IPS Manoj Patil), पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव (DCP Himmat Jadhav),
सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने (ACP Anuja Deshmane)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी (Sr PI Mahesh Bolkotgi),
पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे (PI Yuvraj Nandre), सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील,
पोलीस अंमलदार हवालदार दुशिंग पवार, पालांडे, भांगले, खरात, तरंगे कुंभार यांनी केली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vanraj Andekar Murder Case | कौटुंबिक वादातून वनराज आंदेकर यांचा निर्घुण खून !
जावयानेच आखला खूनाचा कट, गोळीबार करुन कोयत्याने केले वार (CCTV Video)
Andekar Gang History | पुणे : आंदेकर टोळीचा 4 दशकांचा रक्तरंजित इतिहास
Vanraj Andekar Murder Case | पुणे : वनराज आंदेकर खून प्रकरणी दोघांना (कोमकर बंधूना) अटक