Pune Crime News | गाडीला धडक लागल्याचा बहाणा करुन चोरी करणार्या ‘टक टक’ गँगचा पर्दाफाश; कारचालकांना लक्ष्य करुन चोर्या करणारे दोन परप्रांतीय चोरटे जेरबंद, तीन गुन्हे उघडकीस
पुणे : Pune Crime News | उत्तर प्रदेशातील मेरठ येथून येऊन पुण्यात सिग्नलला तसेच गर्दीच्या ठिकाणी कारचालकांना लक्ष्य करुन त्यांच्या गाडीतील मोबाईल व मौल्यवान वस्तू चोरुन नेणार्या “टक टक’ गँग च्या दोघा परप्रांतीय चोरट्यांना गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने पकडले. त्यांनी फरासखाना, अलंकार, विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर्या केल्याची कबुली दिली आहे़ २०० ते २५० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करुन या चोरट्यांचा मागोवा पोलिसांनी घेतला होता.
रवी ओमप्रकाश कोहली Ravi Omprakash Kohli (वय ३८) आणि अफजल कय्यूम अब्बासी Afzal Qayyum Abbasi (वय ३८, दोघेही रा. मेरठ, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
शहराच्या मध्यवस्तीत कारचालकांशी वाद घालून त्याच्या गाडीतील मोबाईल चोरुन नेल्याची घटना १३ फेब्रुवारी रोजी घडली होती. गुन्हे शाखेतील युनिट १ चे पथक या चोरट्यांचा शोध घेत होते. सीसीटीव्ही फुटेज तपासणी करीत असताना पोलीस अंमलदार मयुर भोसले, अमित जमदाडे, हेमंत पेरणे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली केली. या गुन्ह्यातील संशयित चोरटे हे समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉजमध्ये येणार आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक अजित जाधव व त्यांच्या सहकार्यांनी लॉजच्या परिसरात सापळा रचून थांबले. मिळालेल्या माहितीतील वर्णनाचे दोघे जण तेथे आले असताना पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी मोबाईल चोरल्याची कबुली दिली.
अधिक चौकशीत कोथरुडमधील कर्वे रोडवरील सारस्वत बँकेसमोर ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी कारचालकाचे लक्ष विचलित करुन चालकाशेजारी सीटवर ठेवलेला अॅपलचा आयफोन १७ प्रो व पॉकेट चोरुन नेल्याचे सांगितले. अलंकार पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल होता.
त्याचप्रमाणे विमाननगर चौकात १९ ऑगस्ट २०२५ रोजी एका स्विफ्ट कारचालकाला कार पायावरुन गेली असा बहाणा करुन त्याच्या गाडीमधील सॅमसंग व वन प्लस कंपनीचा असे दोन मोबाईल चोरल्याचे सांगितले. विमानतळ पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद होती़ या दोघांना फरासखाना पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त शैलेशा संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित जाधव, पोलीस अंमलदार मयुर भोसले, अमित जमदाडे, हेमंत पेरणे, अनिकेत बाबर, निलेश साबळे, शशिकांत दरेकर, संदेश काकडे, ज्योती मुल्का आणि प्रफुल शेलार यांनी केली आहे.
