Pune Crime News | छत्रपती संभाजीनगरहून अंमली पदार्थ आणून विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक; 12 लाखांचे मॅफेड्रॉन हस्तगत

पुणे : Pune Crime News | छत्रपती संभाजीनगर येथून मॅफेड्रॉन (Mephedrone) हा अंमली पदार्थ आणून पुण्यात विक्री करण्याकरता जवळ बाळगणार्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) अटक केली आहे. त्यांच्याकडून ११ लाख ९० हजार २०० रुपयांचा एम डी (मॅफेड्रॉन) जप्त करण्यात आला आहे.
मल्लीनाथ बसवराज गौडगाव (वय २९, रा. आंबेगाव, मुळ गाव जेऊर, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) आणि नौशाद अब्दुलअली शेख (वय ३६, रा. पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे तपास पथकातील पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे, सचिन सरपाले यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली की, नवले पुलाकडून कात्रजकडे जाणार्या महामार्गावर राजमाता उद्यान समोरील रोडवर दोघे अंमली पदार्थ घेऊन येणार आहेत. या माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी राजमाता उद्यानासमोर सापळा रचला. यावेळी संशयास्पदरित्या थांबलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ११ लाख ९० हजार २०० रुपयांचे ५४ ग्रॅम ५१ मिलीग्रॅम एम डी हस्तगत केले. त्यांच्याकडून चौकशी केल्यावर त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील जहीर खान याच्याकडून हा माल घेतल्याचे सांगितले. पोलीस जहीर खान याचा शोध घेत आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar), सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil), पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil), सहायक पोलीस आयुक्त नंदिनी वग्याणी (ACP Nandini Vagyani) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी एस पाटील (Sr PI D. S. Patil), पोलीस निरीक्षक शरद झिने (PI Sharad Zine),
सहायक पोलीस निरीक्षक समीर कदम (API Sameer Kadam),
पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी (PSI Nilesh Mokashi), पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे,
सचिन सरपाले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, महेश बारवकर, चेतन गोरे,
निलेश जमदाडे, हनमंत मासाळ, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, अवधुत जमदाडे, सतिश मोरे,
निलेश खैरमोडे, मितेश चोरमाले यांच्या पथकाने केली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा