Pune Crime News | तडीपारीचा भंग करुन दहशत माजविणारे दोन गुंड जेरबंद

Arrest

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | तडीपार केले असतानाही त्याचा भंग करुन शहरात येऊन कोयता, तलवारी घेऊन दहशत माजविण्याचे दोन प्रकार समोर आले आहेत. पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) या दोघा गुंडांना अटक केली आहे.

प्रशांत दिलीप कोकरे Prashant Dilip Kokre (वय ३०, रा. दळवीनगर, चिंचवड) आणि योगेश ऊर्फ विक्की कालिदास डावरे
Yogesh Alias Vicky Kalidas Davre (वय २८, रा. काळेवाडी पोलीस चौकीमागे, आदर्शनगर, काळेवाडी) अशी अटक केलेल्या गुंडांची नावे आहेत. (Tadipar Criminals Arrested)

याबाबत पोलिस अंमलदार गोविंद डोके यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना चिंचवड रेल्वे स्टेशन येथील किंग्स टाऊन सोसायटीचे बाजुला गाडी पार्किंगजवळ बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडला. गुंड प्रशांत कोकरे याला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासह पुणे जिल्ह्यातून पोलीस उपायुक्त परिमंडळ एक यांनी तडीपार केले होते. या तडीपारीच्या आदेशाचा भंग करुन कोकरे छोटी तलवार घेऊन चिंचवड रेल्वे स्टेशनजवळ फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तेथे जाऊन कोकरे याला पकडून त्याच्याकडील छोटी तलवार जप्त केली. पोलीस उपनिरीक्षक गोडसे तपास करीत आहेत. (Pune Crime News)

दुसर्‍या घटनेत गुन्हे शाखेतील हवालदार मोहम्मद गौस नदाफ यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. योगेश ऊर्फ विकी डावरे याला दोन वर्षांसाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे शहर व ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे. असे असताना तो थेरगाव स्मशानभूमी येथे आला असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट ४ ला मिळाली. पोलिसांनी तेथे जाऊन विक्की डावरे याला पकडले. त्याच्याकडील कोयता जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Rains | पुण्यात पावसाचा हाहाकार! सोसायट्यांमध्ये छातीपर्यंत पाणी; NDRF चे पथक मदतीसाठी दाखल

Lavasa Landslide | लवासामध्ये दरड कोसळल्याने 2 व्हिला गाडले गेले; तीन ते चार जण बेपत्ता

Pune Rainfall Update | पुणेकरांसाठी आणखी धोक्याची घंटा; हवामान विभागाकडून इशारा; रेड अलर्ट जारी

You may have missed