Pune Crime News | स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणार्‍या दोन महिला मॅनेजर, मालकीण यांना पकडून 5 पिडित महिलांची केली सुटका

Pune Crime News | Two female managers, owners of a spa who were involved in prostitution were arrested and 5 victims were rescued.

पुणे : Pune Crime News |  मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविणार्‍या स्पावर अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या पोलिसांनी छापा घालून मॅनेजर व मालकीण असलेल्या दोन महिलांना ताब्यात घेतले. तेथून ५ पिडित महिलांची सुटका केली.

स्पा मॅनेजर (वय ३८) आणि मालकीण (वय ३६) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. ही कारवाई खराडीतील संभाजीनगर येथील विश्वविमल कॉम्प्लेक्समधील ए वन स्पा येथे ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात आली.

याबाबत पोलीस हवालदार वैशाली शिवाजी इंगले यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांना खराडीतील ए वन स्पामध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे बनावट ग्राहक पाठविला. बनावट ग्राहकाने सांकेतिक भाषेत मेसेज पाठविल्यावर पोलिसांनी स्पावर छापा टाकला. तेथे ५ पिडित महिलांकडून स्पा मॅनेजर व मालकीण  या वेश्या व्यवसाय करवुन घेत होत्या. ग्राहकाकडून मिळालेल्या पैशांपैकी निम्मे पैसे स्वत: घेत असत. पोलिसांनी दोघींवर गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे तपास करीत आहेत.

You may have missed