Pune Crime News | ताडीवाला रोडवर पार्किंगच्या वादातून दोन गट एकमेकांना भिडले; एकमेकांवर हत्याराने वार करुन केले जखमी, बंडगार्डन पोलिसांनी 15 जणांवर केला गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  पार्किंगवरुन सुरु असलेल्या वादातून जेवणाचा कार्यक्रम सुरु असताना दोन गट एकमेकांना भिडले. त्यांनी एकमेकांवर हत्याराने वार करुन जखमी केले़ बंडगार्डन पोलिसांनी परस्परविरोधी फिर्याद घेऊन १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यात ५ महिलांचा समावेश आहे.

याबाबत अजय आनंद भालशंकर (वय २९, रा. प्रायव्हेट रोड, ताडीवाला रस्ता) याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सोनू काळे (वय ३२),  दस्तूर नदाफ (वय २०),  गणेश काळे (वय २६),  रफीक नदाफ (३५),  इस्माइल नदाफ (वय ४०), साहिल नदाफ (वय २०), भूषण भंडारी (वय २५, सर्व रा. प्रायव्हेट रस्ता, पुणे स्टेशनजवळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे  घरंच्या सोबत लुंबिनीनगर येथे २५ जानेवारी रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास बोलत थांबले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांचा भाऊ अक्षय व बहिण अस्मिता सावंत, पत्नी पुनम भालशंकर, भावजय स्वप्नाली यांना खुर्च्या, ताट, जाळण्यासाठीचे लाकडे यांनी मारहाण करुन जखमी केले. त्यांचा भाऊ अमर भालशंकर यांच्या दुचाकीचे नुकसान केले.

त्याविरोधात अक्षय उर्फ सोनू हरिश्चंद्र काळे (वय ३३, रा. प्रायव्हेट रोड, ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशनजवळ) याने फिर्याद दिली आहे.  त्यानुसार, अक्षय भालशंकर (वय २८), अजय भालशंकर (वय ३०), अमर भालशंकर (वय २२), आम्रपाली अक्षय भालशंकर (वय २५), पुनम अजय भालशंकर (वय २६), दीपाली (वय २०), रुपाली (वय२१), अरुणा भालशंकर (वय ४९, सर्व रा. प्रायव्हेट रोड, बंडगार्डन) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रायव्हेट रोड येथे सार्वजनिक जेवणाचा कार्यक्रम चालू असताना आरोपींनी फिर्यादी यांना मारहाण करुन जखमी केले. त्यांचे मित्र भूषण भंडारी यांच्या डोळ्याचे वर भुवईवर जखम झाली. दीपक शिंदे यांच्यावर हत्याराने वार करुन जखमी केले. अनुराग तेलोरे यांच्या पाठीवर वार करुन जखमी केले. गिता घाटे यांच्या छातीत व पाटीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक गर्कळ तपास करीत आहेत.

You may have missed