Pune Crime News | अल्पवयीन 14 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोघा नराधमांना अटक; आई, भावाला मारुन टाकण्याची दिली होती धमकी

Arrest

पुणे : Pune Crime News | १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाºया दोघा नराधमांना सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे.

संदिप रवींद्र पाटील Sandeep Ravindra Patil (वय २०) आणि सहिल संतोष साळवे Sahil Santosh Salve (वय १९, दोघे रा. मानाजीनगर, नऱ्हे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत या मुलीच्या आईने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणांनी फिर्यादीच्या १४ वर्षाच्या मुलीबरोबर ओळख निर्माण केली. तिच्याबरोबर जबरदस्तीने शारीरीक संंबंध केले. तसेच याबाबत कोणाला सांगितले तर तुझ्या आईला व भावाला मारुन टाकेल, अशी धमकी दिली होती. या धमकीमुळे या मुलीने हा प्रकार कोणाला सांगितला नव्हता. मुलीच्या वागणूकीत बदल जाणवल्याने आईने तिला विश्वासात घेऊन विचारणा केल्यावर तिने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक अक्षय पाटील अधिक तपास करीत आहेत.

You may have missed