Pune Crime News | पुण्यात गांजा पुरविणार्या दोघांना धुळे, नंदुरबार येथून केली अटक; अंमली पदार्थविरोधी पथकाने चौघांकडून 43 किलो गांजासह 21 लाखांचा माल केला जप्त
पुणे : Pune Crime News | कदमवाक वस्ती येथे गांजा विक्री करणार्या दोघांना पकडून अंमली पदार्थ विरोधी पथकाने ३४ किलो गांजा पकडला होता. त्यांना गांजा पुरविणार्या दोघांना धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून पकडण्यात आले.
मंगेश जाण्या पावरा (वय २९, रा. भोगावडे खुर्द, ता. धडगाव, जि. नंदुरबार) आणि ज्ञानेश्वर मगन पावरा (वय २५, रा. मु. पो. सांगवी, ता. शिरपूर, जि. धुळे) असे अटक केलेल्यांची नावे आहेत.
कदम वाक वस्ती येथे अक्षय पाडुळे (वय ३१, रा. नवीन म्हाडा कॉलनी, हडपसर) व विशााल जाधव (वय २८, रा. हिंगणे मळा) यांना अटक करुन त्यांच्याकडून ६ लाख ८८ हजार ८०० रुपयांचा ३४ किलो ४४० ग्रॅम गांजा जप्त केला होता. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एन डी पी एस अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक वाहिद पठाण व पथकाने त्यांच्याकडे कौशल्यपुर्ण तपास करुन त्यांना गांजा पुरविणार्यांची माहिती काढली. त्यानुसार पोलीस पथक नंदुरबार जिल्ह्यात रवाना झाले. मंगेश पावरा याला नंदुरबारच्या अतिशय डोंगराळ भागातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या तपासात ज्ञानेश्वर पावरा याचे नाव समोर आले़. ज्ञानेश्वर पावरा याला मुंबई – आग्रा महामार्गावरील शिरपूर तालुक्यातील नवी सांगवी येथून पकडण्यात आले. त्याच्याकडे ९ किलो ४२० ग्रॅम गांजा व होंडा कार जप्त करण्यात आली.
या गुन्ह्यात एकूण ४ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण २१ लाख ९१ हजार ४०० रुपयांचा माल त्यात ४३ किलो ७६ ग्रॅम गांजा तसेच दोन कार, ५ मोबाईल असा माल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार विठ्ठल साळुंखे, संजय राजे, रिहान पठाण, अमोल सरडे, निलेश जाधव, विजय कांबळे, मंगेश गुंड, कदम, अक्षय शिर्के, शेलार यांनी केली आहे.
