Pune Crime News | नशापाणी करुन गोंधळ घालणार्या दोघांना सामाजिक सेवा करण्याची दिली शिक्षा
पुणे : Pune Crime News | पुणे महानगर पालिका इमारतीच्या पाठीमागे सार्वजनिक ठिकाणी नशा पाणी करुन गोंधळ घालणार्या दोघांना न्यायालयाने सामाजिक सेवा करण्याची शिक्षा सुनावली आहे.
विनोद वसंत माकोडे Vinod Vasant Makode (वय ३२) आणि सागर रामकृष्ण बोदाडे Sagar Ramakrishna Bodade (वय ३६, दोघे रा. सांगवी खुर्द, अकोला) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलीस अंमलदार मखरे व तायडे हे २ डिसेंबर रोजी रात्री सव्वा नऊ वाजता पुणे महापालिकेच्या इमारतीच्या पाठीमागे सार्वजनिक ठिकाणी दारु पिऊन गोंधळ घालत होते. दोघांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या गुन्ह्यांमधील आरोपी विरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला होता. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांच्यासमोर त्यांना हजर केले असता त्यांनी गुन्हा कबुल केला. न्यायालयाने त्यांना ४ दिवस दररोज ३ तासांची सामुदायिक सेवा करण्याची शिक्षा सुनावली.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग ४ क अन्वये ही शिक्षा देण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या अंमलदाराच्या देखरेखीखाली ही शिक्षा पार पाडावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस अंमलदार सुधीर घोटकुळे, मखरे, तागडे व कोर्ट अंमलदार कांबळे यांनी ही कामगिरी केली आहे.
