Pune Crime News | चोरट्याकडून दोन रिक्षा, एक मोटारसायकल जप्त; सीसीटीव्हीमुळे चोरट्याची चोरी गेली पकडली (Video)
पुणे : Pune Crime News | नरपतगिरी चौकाजवळ पार्क केलेली रिक्षा चोरीला गेली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) तपासून ते चोरट्यापर्यंत पोहचले. चोरट्याकडून रिक्षा तर मिळाली (Vehicle Theft Detection). त्याचवेळी आणखी एक रिक्षा व एक मोटारसायकल असे वाहन चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहे. आनंद ऊर्फ अक्षय प्रल्हाद साळुंखे (वय २३, रा. मानकाईनगर, आव्हाळवाडी) असे या चोरट्याचे नाव आहे. (Arrest In Vehicle Theft)
https://www.instagram.com/p/DDbRObdJ5bI
याबाबत विजयशंकर रामअधार पाठक (वय ७०, रा. मंगळवार पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police) फिर्याद दिली आहे. त्यांच्या हॉटेल राजधानीसमोरील अभ्युदय सोसायटीबाहेर त्यांनी रिक्षा पार्क केली होती. ते रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना रिक्षा पहात होते. २८ नोव्हेबर रोजी पहाटे ते मॉर्निग वॉकला बाहेर पडले तेव्हा रिक्षा जागेवर नव्हती. त्यांनी समर्थ पोलीस ठाण्यात रिक्षा चोरीची फिर्याद दिली. समर्थ पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्याचे फुटेज तपासले. त्यात एक जण रिक्षा घेऊन जाताना दिसून आला. तसेच बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आनंद साळुंखे याला अटक केली. त्यांच्याकडून चोरलेली रिक्षा जप्त केली. अधिक तपासात चतु:श्रृगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेली रिक्षा आणि हडपसर परिसरातून चोरीला गेलेली मोटरसायकल असे तीन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल, सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, सहायक फौजदार संतोष पागार, पोलीस अंमलदार इम्रान शेख, रवींद्र अैचारे, शिवा कांबळे, अमोल गावडे, रहीम शेख, शरद घोरपडे, कल्याण बोराडे यांनी केली आहे. (Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत
Kolhapur Crime News | कोल्हापूर: स्पर्धा परीक्षेतील अपयशाच्या नैराश्यातून युवकाने संपवलं जीवन