Pune Crime News | वानवडीत दोघांवर तलवारीने वार, 13 जणांवर गुन्हा; तिघांना अटक

Sword Attack

पुणे : Wanwadi Pune Crime News | जुन्या भांडणातून दोन जणांवर तलवारीने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी 13 जणांवर गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे. हा प्रकार बुधवारी (दि.10) रात्री बाराच्या सुमारास हांडेवडी रोड (Handewadi Road) वरील जैन टाऊन शीपच्या (Jain Township Handewadi) बाजूला घडला आहे.

आरमान इस्लाम शेख व नदीम मोहम्मद हुसेन शख (रा. रामटेकडी) असे जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत पोलीस शिपाई बालाजी वाघमारे (वय-33) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमीन अशिफ खान, आयान आजीम शेख, आबुरजर युसुफ शेख यांना अटक केली आहे. तर आरकान तसबीर शेख, अमन तसबीर शेख, रेहान रियाज खान, सादीक उर्फ बुरुन शेख, आफताब शेख, दानिश इब्राहिम शेख, फराज वजीर शेख, कैफ सलिम शेख, शाहरुख सलिम शेख (सर्व रा. सय्यदनगर), आरबाज शेख (रा. रामटेकडी, हडपसर) यांच्यावर भान्यासं 109, 118 (2), 189(2), 191(2), 191(3), 190,191(3), 190 आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

फिर्य़ादी बालाजी वाघमारे व पोलीस शिपाई शिवानंद लुंगसे हे रात्रपाळी करता महंमदवाडी मार्शल कर्तव्य करत होते. त्यावेळी त्यांना हांडेवाडी रोडवरील जैन टाऊनशीपच्या बाजूला काही मुले आपापसात भांडण करुन गोंधळ घालत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार फिर्य़ादी व त्यांचे सहकारी त्या ठिकाणी गेले असता आरोपी आरकान शेख याच्या हातात तलवार घेऊन पळून जाताना दिसला.
आरोपींनी आरमान शेख आणि नदीम शेख यांच्यावर वार करुन गंभीर जखमी केल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.
आरोपींनी केलेल्या हल्ल्यात अरमान याच्या हाताचा कोपरा, पंजा व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
तर नदीम याच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.
घटना घडल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन तिघांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime | पुणे : सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक परिसरात बेकायदा पिस्तूल मित्राला दाखवताना गोळीबार, एक जखमी

Mumbai Police Constable Wife Suicide | हुंड्यासाठी पोलीस पतीचे टोमणे, हळद उतरण्यापूर्वीच पत्नीने आयुष्य संपवलं!

Vidhan Parishad Election Maharashtra | विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटींगची भीती; कोणते उमेदवार डेंजर झोनमध्ये?

Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड

You may have missed