Pune Crime News | दुचाकी वाहन चोराला लोहगाव पोलिसांनी केले जेरबंद

Pune Crime News | Two-wheeler thief arrested by Lohegaon police

पुणे : Pune Crime News |  घराच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली मोटारसायकल चोरुन नेणार्‍या वाहन चोराला सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने जेरबंद केले आहे.

अमन शेषराव कांबळे Aman Sheshrao Kamble (रा. शिवशंभो पार्क, पठारे वस्ती, लोहगाव) असे या वाहन चोराचे नाव आहे.

याबाबत दीपक लक्ष्मण जाधव (वय ३०, रा. गुलमोहर सोसायटी, जर्नाधननगर, वडगाव शिंदे रोड, लोहगाव) यांनी फिर्याद दिली होती. त्यांनी सोसायटीच्या आवारात पार्क केलेली मोटारसायकल १ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ ते रात्री ९ वाजेच्या दरम्यान चोरीला गेली होती.

लोहगाव पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार जोतीराम देवकाते यांनी घटनास्थळावरील व आजु बाजुचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्या फुटेजमध्ये एक संशयित हा मोटारसायकल चोरुन घेऊन जाताना दिसला. त्यावरुन जोतीराम देवकाते यांना  बातमीदाराकडून माहिती मिळाली की, हा अमन कांबळे आहे. तो संतनगर परिसरात मोटारसायकलसह फिरत आहे. त्यानंतर लोहगाव पोलीस ठाण्यातील तपास पथकाने सापळा रचून अमन कांबळे याला पकडून त्याच्याकडील मोटारसायकल जप्त केली.

ही कारवाई पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त नुतन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे, पोलीस अंमलदार गणेश इथापे, जोतीराम देवकाते, दादासाहेब बर्डे, ज्ञानदेव आवारी, हरीप्रसाद पुंडे, बाळासाहेब शिरसाठ यांनी केली आहे.

You may have missed