Pune Crime News | विसर्जन मिरवणुकीत दागिने चोरणार्‍या महिलांच्या टोळीतील दोन महिला जेरबंद; फरासखाना पोलिसांची कामगिरी

woman-arrested

पुणे : Pune Crime News | गणेश विसर्जन मिरवणुकीतील (Ganesh Visarjan Miravnuk) गर्दीचा गैरफायदा घेऊन महिलांचे दागिने चोरणार्‍यासाठी (Chain Snatching) आलेल्या महिलांच्या टोळीमधील २ महिलांना फरासखाना पोलिसांनी (Faraskhana Police Station) अटक केली आहे.

https://www.instagram.com/p/DAGFVuSiahF

गिता वेंकटेश खट्टी (वय २०, रा. पाथर्डी फाटा, नाशिक) आणि पुजा प्रविण गाझु (वय २४, रा. पाथर्डी फाटा, नाशिक) अशी त्यांची नावे आहेत. शिरवळ हायवे ते वारजे पुल दरम्यान एस टी बस प्रवासात त्यांनी १४० ग्रम वजनाचे सोन्याचे दागिने चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. नवी मुंबईतील एन आर आय पोलीस ठाण्यात (NIR Police Station Mumbai) याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो उघडकीस आला आहे.

https://www.instagram.com/p/DAGDR1qiuFn

गणेशा विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी दूर दूरहून भाविक येत असतात. त्या दरम्यान संशयित चोर, महिलांवर लक्ष ठेवण्याबाबत फरासखाना पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रशांत भस्मे यांनी तपास पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदार यांना सतर्क राहून महत्वाच्या सूचना दिल्या होत्या. तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड (API Vaibhav Gaikwad), पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे (PSI Arvind Shinde) यांनी गोपनीय पथक तयार केले. त्या दरम्यान, पोलीस अंमलदार गजानन सोनुने (Gajanan Sonune) व रेखा राऊत (Rekha Raut Police) यांच्या गोपनीय बातमीवरुन दोन महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या तपासात १० सप्टेबर रोजी त्यांनी एस टी बस प्रवासात ९ लाख ८० हजार रुपयांचे १४० ग्रॅम वजनाचे दागिने चोरल्याचे निष्पन्न झाले.

https://www.instagram.com/p/DAF2-YXNuhQ

चोरी करण्याची पद्धत

या महिला गणेशोत्सवात गर्दीच्या ठिकाणी जात. भाविक त्यांच्याकडील मोबाईलमध्ये फोटो घेण्यात व्यस्त असताना भाविकांचे गळ्यातील तसेच अंगावरील मौल्यवान दागिने चोरत असत. पोलिसांच्या सतर्कतेमुळे विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर सोन्याचे दागिने चोरी होण्याचा मोठा अनर्थ टाळण्यात फरासखाना पोलिसांना यश आले आहे.

https://www.instagram.com/p/DAF1I3TC3GV

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar),
सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil),
पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल (Sandeep Singh Gill), सहायक पोलीस आयुक्त नुतन पवार (ACP Nutan Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे (Sr PI PI Prashant Bhasme), पोलीस निरीक्षक अजित जाधव (PI Ajit Jadhav), सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे, सहायक फौजदार मेहबुब मोकाशी, पोलीस अंमलदार तानाजी नागंरे, गजानन सोनुने, रेखा राऊत, महेश राठोड, नितीन जाधव, नितीन तेलंगे, प्रविण पासलकर, वैभव स्वामी, विशाल शिंदे, गौस मुलाणी, समीर माळवदकर, सुमित खुट्टे, संदिप कांबळे, महेश पवार, शशिकांत ननावरे, चेतन होळकर यांनी केली आहे.

https://www.instagram.com/p/DAFfFJgCyIJ

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Aarpaar Marathi | ‘आरपार’तर्फे प्रसारित केलेल्या पुनीत बालन प्रस्तुत ‘बाप्पा मोरया रे’ विसर्जन मिरवणुकीच्या ‘थेट प्रक्षेपणाला’ भरघोस प्रतिसाद!

IPS Shivdeep Lande Resigns | बिहारचे सिंघम मराठमोळे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडेंचा तडकाफडकी राजीनामा; कारण अस्पष्ट

BJP Strategy For MH Election 2024 | भाजपच्या 50 उमेदवारांच्या यादीचा मुहूर्त ठरला; विधानसभेच्या 160 जागा लढण्याच्या तयारीत

You may have missed