Pune Crime News | पुणे: प्रेमसंबंधांना विरोध केल्याने मामावर कोयत्याने वार करुन केले गंभीर जखमी; आंबेगाव पठारमधील घटना

Pune Crime News | ‘Did you have a lot of fun, I won’t let you live’! Attempt to kill someone by stabbing them in the head with a sickle over an old quarrel

पुणे : Pune Crime News | अल्पवयीन भाचीच्या प्रेमसंबंधांना विरोध केल्याच्या कारणावरुन एका तरुणाने मामावर कोयत्याने वार करुन त्याला गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तरुणाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पद्मावती येथील तळजाई वसाहतमध्ये राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत आंबेगाव पठार येथील एका ३० वर्षाच्या मामाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार आंबेगाव पठार येथील शाम सुपर मार्केटसमोर २२ जुलै रोजी सकाळी १० वाजता घडला होता.

याबाबत पोलिसंनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या १५ वर्षाच्या अल्पवयीन भाचीबरोबर तरुणाचे प्रेमसंबंध आहेत. फिर्यादी व त्यांची बहिण यांनी तरुणाला तिच्याशी संबंध ठेऊ नको, असे दोन तीन वेळा समजावून सांगितले. तरी तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत होता. फिर्यादी हे मोटारसायकलवरुन जात असताना आंबेगाव पठार येथील शाम सुपर मार्केटसमोर तरुणाने त्यांना अडवले. फिर्यादीला का रे तू आमच्या मध्ये येतोस, असे म्हणून फिर्यादीच्या डाव्या हाताचे पंजावर हत्याराने वार करुन गंभीर जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक परदेशी तपास करीत आहेत.

You may have missed