Pune Crime News | पुणे : … म्हणून महर्षीनगर येथे अल्पवयीन मुलाने केली 10-12 वाहनांची तोडफोड

Maharshi Nagar Pune Crime News

पुणे : Maharshi Nagar Pune Crime News | पुणे शहरातील गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. जबरी चोरी, खून, खुनाचा प्रयत्न, दहशत पसरवणे, वाहनांची तोडफोड (Vehicles Vandalized In Maharshi Nagar) अशा घटना वारंवार घडत आहेत. या घटनांमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलाने पार्क केलेल्या सात ते आठ वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. काम करत नसल्याने शेजारी हिणवतात म्हणून या मुलाने वाहनांची तोडफोड केली. ही घटना बुधवारी (दि.10) मध्यरात्री तीनच्या सुमारास गुलटेकडी (Gultekdi) परिसरात घडली.

याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police Station) अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अल्पवयीन मुलाने दहशत निर्माण करण्यासाठी हे कृत्य केले आहे. त्याने महर्षीनगर येथील क्रिसेंट हायस्कूल समोर (Crescent High School in Maharshi Nagar) लावलेला टेम्पो, तीन चाकी मालवाहतूक करणारा टेम्पो आणि मोठा टेम्पो अशा 10 ते 12 वाहनांची तोडफोड करुन नुकसान केलं. या अल्पवयीन तरुणाने यापूर्वी देखील असे कृत्य केल्याची माहिती मिळत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाच्या वडीलांचे निधन झाले असून तो आई सोबत राहत आहे. तो काही काम धंदा करत नसल्याने आजूबाजूचे लोक त्याला हिणवत होते. या तणावतून त्याने बुधवारी मध्यरात्री दारु पिऊन दगडाने सात ते आठ वाहनांची तोडफोड केली. त्याला ताब्यात घेतले असून पोलीस तपास करत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Reliance Retail | अनंतच्या विवाहापूर्वी नवीन बिझनेस सुरू करण्याची तयारी,
‘या’ व्यवसायात एंट्री करणार मुकेश अंबानी, चीनची कंपनी आणणार भारतात

Pune Crime News | पुणे: गाडीत बसण्यास नकार दिल्याने अश्लील शिवीगाळ करुन असभ्य वर्तन, एकाला अटक

Gautam Gambhir | गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक, जय शाहांची घोषणा

Pune Bopodi Hit & Run Case | पुणे पोलीस हवालदार मृत्यू प्रकरण : कारमधील तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात,
कारला ओव्हरटेक केल्याचा आला राग, भरधाव वेगात कार चालवली अन्…

You may have missed