Pune Crime News | अल्पवयीन मुली, तरुणींचा विनयभंग करणार्‍या टोळभैरवाच्या विमानतळ पोलिसांनी आवळल्या मुसक्या; एक वर्षापासून मोकाट फिरुन तरुणींना देत होता त्रास

Pune Crime News | Viman Nagar police caught a man who molested minor girls and young women; He had been roaming around freely for a year, harassing young women

पुणे : Pune Crime News | सुनसान रस्त्याने जाणार्‍या अल्पवयीन मुली, तरुणींची छेडछाड करुन त्रास देणार्‍या टोळभैरवाच्या विमानतळ पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. गेले वर्षभर तो तरुणींना त्रास देत होता. पोलिसांनी तब्बल २४५ सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करुन त्याला पकडण्यात यश मिळविले आहे.

सागर राम सोनवणे Sagar Ram Sonawane (वय २२, रा. हनुमान कॉलनी, शास्त्री चौक रोड, भोसरी) असे या टोळभैरवाचे नाव आहे. विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण ५ विनयभंगाचे गुन्हे केल्याची कबुली त्याने दिली आहे.

https://www.instagram.com/reel/DSKBRn6CcyY/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

दुचाकीवरुन येऊन लोहगाव येथील गणेश पार्क परिसरात एकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार नुकताच घडला होता. विमाननगर परिसरात यापूर्वी असे अनेक गुन्हे दाखल होते. पोलीस अंमलदार योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, लालु कर्‍हे, राहुल जोशी यांनी घटनास्थळावरील व आजूबाजूचे आरोपीच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावरुन विमाननगर, विश्रांतवाडी, दिघी, भोसरी या भागात माग काढून तब्बल २४५ सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यातून सागर सोनवणे हा हे उद्योग करीत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले.

विमाननगर परिसरात त्याने ५ विनयभंगाचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय अन्य पोलीस ठाण्याच्या परिसरात त्याने गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. हा आरोपी रात्रीचे वेळी सुनसान रस्त्यावर महिलांची छेडछाड करुन मोटारसायकलवरुन पळून जायचा व सीसीटीव्हीमध्ये येणार नाही, याची काळजी घ्यायचा.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक शरद शेळके यांच्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, मनोज बरुरे, पोलीस अंमलदार योेगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, लालु कन्हे, राहुल जोशी, रुपेश पिसाळ, शैलेश नाईक, राकेश चांदेकर, अंकुश जोगदंडे, गणेश इथापे, दादासाहेब बर्डे, सागर कासार, पांडुरंग  म्हस्के, सना शेख, आसमा शेख यांनी केली आहे. 

You may have missed