Pune Crime News | अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्या तरुणावर विमानतळ पोलिसांनी केला गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला प्रपोज करुन तिला व तिच्या आईवडिलांना मारण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत एका १७ वर्षाच्या मुलीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी आदित्य जर्नादन बेले Aditya Jarnadan Bele
(वय २०, रा. कलवड वस्ती) याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे़ हा प्रकार जानेवारी ते जून २०२५ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेले व पिडित मुलगी हे दोघे दहावीपर्यंत एकाच शाळेत होते. त्या दरम्यान यांची ओळख झाली होती. आदित्य बेले याने या मुलीला प्रपोज केले होते. त्याला तिने सुरुवातीला नकार दिला. तेव्हा त्याने तिला व तिच्या आईवडिलांना मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने होकार देण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याने या मुलीशी वारंवार जबरदस्तीने शारीरीक संंबंध ठेवले. त्यावेळी तिचे मोबाईलमध्ये फोटो काढले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन, अशी धमकी देऊन तिच्याशी त्याने शारीरीक संबंध करण्यास भाग पाडले. त्याच्या या लैंगिक त्रासाला कंटाळून आता तिने पोलिसांकडे धाव घेतली . विमानतळ पोलिसांनी पोक्सो अंतर्गत लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आदित्य बेले याचा शोध घेत असून सहायक पोलीस निरीक्षक देवतळे तपास करीत आहेत.
