Pune Crime News | पैसे देण्याचे आमिष दाखवून 7 वर्षाच्या मुलीचा विनयभंग करणार्या नराधमाला विश्रामबाग पोलिसांनी केले जेरबंद
पुणे : Pune Crime News | पैसे देण्याचे आमिष दाखवून ७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला रुममध्ये बोलावून तिच्याशी अश्लिल कृत्य करणार्या नराधमाला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे.
विशाल दीपक पानतवणे Vishal Deepak Pantawane (वय ४१, रा. राजेंद्रनगर, नवी पेठ) असे या नराधमाचे नाव आहे.
याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २० मार्च रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल पानतवणे हा एका शाळेत शिपाई म्हणून काम करतो. फिर्यादी यांच्या ७ वर्षाच्या मुलीला विशाल पानतवणे याने रुममध्ये बोलावले. तिला पैसे देण्याचे आमिष दाखवून तिच्या जिन्स पॅन्टमध्ये हात घालून पँट खाली करुन तिच्याचा मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. हा प्रकार कोणाला सांगू नको, अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या या मुलीने त्या दिवशी कोणाला सांगितले नाही. दुसर्या दिवशी आपल्या आईला याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी विशाल पानतवणे याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक किरण शिंदे तपास करीत आहेत.
