Pune Crime News | बसमधील गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना विश्रामबाग पोलिसांनी केली अटक; तीन गुन्हे उघडकीस

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | वारजे बसस्टॉप ते शनिवार पेठ दरम्यान बसने प्रवास करताना महिलेच्या हातातील सोन्याची पाटली चोरुन नेणार्‍या दोघा चोरट्यांना विश्रामबाग पोलिसांनी केसरीवाडा ते मुंढवापर्यंत सीसीटीव्ही मार्फत मागोवा घेऊन अटक केली. त्यांच्याकडून ३ गुन्हे उघडकीस आले आहेत.

बसवराज विजय सुतार Basavaraj Vijay Sutar (वय २५, रा. केशवनगर पोलीस चौकीजवळ, केशवनगर, मुंढवा) आणि कृष्णा रमेश माने Krishna Ramesh Mane (वय २५, रा. सरोदय कॉलनी, मुंढवा) अशी चोरट्यांनी नावे आहेत.

वारजे येथील महिला २ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड ते २ वाजून १५ मिनिटांच्या दरम्यान वारजे येथील आंबेडकर चौक ते शनिवार पेठ दरम्यान बसने प्रवास करीत होत्या. बसमधील गर्दीचा गैरफायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या उजव्या हातातील सोन्याची पाटली चोरुन नेली होती. विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

विश्रामबाग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर व त्यांचे सहकारी तपास करीत असताना पोलीस अंमलदार अर्जुन थोरात यांनी केसरीवाडा येथील बसस्टॉपवर या महिला उतरल्यानंतरचे सीसीटीव्ही तपासले. तेव्हा एक संशयितास्पद व्यक्ती आढळून आला. त्याचा मागोवा घेत पोलीस मुंढवा येथपर्यंत पोहचले. त्यातून पोलिसांना आरोपींची ओळख पटली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी बसमध्ये गर्दीचा गैरफायदा घेऊन ३ गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून ५ लाख ८७ हजार रुपयांचे ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेगवेगळे दागिने हस्तगत केले आहेत.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषिकेशन रावळे, सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप कसबे, पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांच्या सुचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर, पोलीस अंमलदार सचिन कदम, गणेश काठे, अमोल भोसले, शैलेश सुर्वे, आशिष खरात, सागर मोरे, राहुल मोरे, शिवदत्त गायकवाड, अनिस शेख, अर्जुन थोरात, रेणुका पठारे व स्वाती बर्डे यांनी केली आहे.