Pune Crime News | ट्राफिक सिग्नलच्या चौकातील ट्रॉफिक कंट्रोल बॉक्समधील तब्बल 34 बॅटरी चोरणाऱ्या टोळीला वानवडी पोलिसांनी केले जेरबंद

Pune Crime News | Wanawadi police arrest gang that stole 34 batteries from traffic control box at traffic signal intersection

पुणे : Pune Crime News | शहरातील ट्राफिक सिग्नलच्या चौकात ट्रॉफिक कंट्रोल बॉक्समधील तब्बल ३४ बॅटरी चोरणार्‍या टोळीला वानवडी पोलिसांनी जेरबंद केले. पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत वीज पुरवठा खंडीत झाल्यास सिग्नल याबॅटरीवर चालू राहतो. या बॅटरींना सेन्सर बसविला असल्याने कंपनीला त्याची लगेच माहिती मिळाली. तसेच त्याचवेळी चौकातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वानवडी पोलिसांनी चौघांना पकडले असून पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत.

रिक्षाचालक दीपक अमोल कांबळे Deepak Amol Kamble (वय ३२, रा. रामनगर, रामटेकडी, हडपसर), चांद उस्मान शेख Chand Usman Shaikh (वय २८, रा. रामनगर, रामटेकडी, हडपसर), विकास ऊर्फ टकल्या विजय माने Vikas Alias Taklya Vijay Mane (वय ३६, रा. अरोरा टॉवर्सजवळ फुटपाथ, कॅम्प), अली मुल्ला शेख Ali Mulla Shaikh (वय २७, रा. भाग्योदयनगर, कोंढवा) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पा अंतर्गत ट्रॉफिक कंट्रोलर बॉक्स व त्यामधील बॅटरी बसविणे व इतर सुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम विंध्या टेली लिंक्स ही कंपनी पाहते. वानवडी परिसरातील ए एफ एम सी चौक, रेसकोर्स चौक व काळुबाई चौक या सिग्नलच्या चौकातील ट्रॉफिक कंट्रोलर बॉक्समधील ६ बॅटर्‍या चोरीला गेल्याची तक्रार २७ जानेवारी रोजी कपंनीने वानवडी पोलीस ठाण्यात दिली होती.

वानवडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक व पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख आणि अंमलदारांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून माहिती काढण्याचे काम सुरु केले होते. पोलीस अंमलदार आशिष कांबळे व बालाजी वाघमारे यांना३० जानेवारी रोजी त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की, दीपक कांबळे व त्याचे ३ मित्रांनी सिग्नल बॉक्समधील बॅटर्‍या चोरल्या असून ते विक्री करण्यासाठी रिक्षामधून फिरत आहे. सध्या ते शेवकर वस्तीजवळील रेल्वे फाटकाजवळ कचरा डेपोसमोर थांबले आहेत. या बातमीची खात्री केल्यानंतर पोलीस पथक तेथे पोहचले़ त्यांनी रिक्षामध्ये बसलेल्या चौघांना जागीच पकडले. रिक्षामध्ये एक लोखंडी कटावणी व ६८ हजार रुपयांच्या एकूण ३४ बॅटर्‍या मिळून आला. गुन्ह्यासाठी वापरलेली रिक्षासह पोलिसांनी १ लाख ६८ हजार रुपयांचा माल जप्त केला.

रिक्षामधून जप्त केलेल्या बॅटरी या काळुबाई चौक, ए एफ एम सी चौक, रेसकोर्स चौक, बी टी कवडे चौक, शास्त्रीनगर व सांदलबाबत चौक, धोबी घाट चौक आणि सिटी प्राईट/ पुष्पमंगल चौक तेथून चोरी केल्याचे सांगितले. या सर्व चोर्‍या त्यांनी गेल्या १० ते १५ दिवसात केल्या असून त्याबाबत वानवडीमध्ये २, लक्ष्मीनगर, लष्कर व मार्केटयार्ड पोलीस ठाण्यामध्ये प्रत्येकी एक असे ५ गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक पोलीस आयुक्त नम्रता देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस निरीक्षक संगीता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, पोलीस अंमलदार महेश गाढवे, दया शेगर, अतुल गायकवाड, अमोल पिलाणे, आशिष कांबळे, बालाजी वाघमारे, विठ्ठल चोरमले, गोपाळ मदने, अमोल गायकवाड, अभिजित चव्हाण, अर्शद सय्यद यांनी केली आहे.

You may have missed