Pune Crime News | अश्लिल फोटो सोशल मीडियावर व्हायरल करुन तरुणीकडे 20 लाखांची खंडणी मागणार्‍या नराधमाला वारजे माळवाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  तरुणीचा पाठलाग करुन तिला २० लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्याने अश्लिल फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामी करणार्‍या नराधमाला वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

विजयसिंह संतोष गुंड Vijay Singh Santosh Gund (वय ३०, रा. मडेवडगाव (ढोकराई) ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत एका २४ वर्षाच्या तरुणीने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २५ डिसेंबर २०२५ ते २२ मार्च २०२६ दरम्यान सुरु होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि विजयसिंह गुंड हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. विजयसिंह गुंड हा या तरुणींचा पाठलाग करुन तिला त्रास देत होता. त्याने तिच्याकडे २० लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे दिले नाही तर तिच्यासोबत असलेले फिर्यादीचे अश्लिल फोटो सोशल मीडियावर व्हायरल करुन खल्लास करेन, अशी धमकी दिली. तिच्या इच्छेविरुद्ध तिचा हात धरुन स्वत:जवळ ओढले. सुरुवातीला तिने त्याच्या या धमकीकडे दुर्लक्ष केले. पैसे न दिल्याने त्याने गावाकडील एका ग्रुपवर तिचे अश्लिल फोटो व्हायरल करुन तिची बदनामी केली. ही बाब समजताच या तरुणीने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी विजयसिंह गुंड याच्यावर पाळत ठेवून त्याला ताब्यात घेतले. तरुणीची फिर्याद घेऊन विजयसिंह गुंड याला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी तपास करीत आहेत.

You may have missed