Pune Crime News | ‘आम्हाला क्रॉस जातो का, आम्ही इथले भाई’ म्हणत तिघा जणांच्या टोळक्याने रिक्षाचालकाच्या डोक्यात कुंडी घालून केले गंभीर जखमी
पुणे : Pune Crime News | धायरीतील कोळेश्वर मंदिराजवळ गप्पा मारत थांबलेल्या रिक्षाचालकाने त्यांच्याकडे पाहिल्याच्या कारणावरुन आम्हाला क्रॉस जातो का, आम्ही इथले भाई, असे म्हणून त्यांना लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन डोक्यात कुंडी घालून गंभीर जखमी केले. नांदेड सिटी पोलिसांनी या टोळक्यामधील एकाला अटक केली आहे.
याबाबत प्रसाद गणेश भोरपकर (वय ३३, रा. शिव अपार्टमेंट, रायकरनगर, धायरी) यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी गौरव राजू घाडगे Gaurav Raju Ghadge (वय १९, रा. शांती प्रेस्टीज, वडगाव) याला अटक केली आहे. सोन्या हिवाळे आणि यश देसाई यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद भोरपकर यांच्यावर जीवन उदय मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार करत आहे. ते रिक्षाचालक आहे. प्रसाद भोरपकर हे ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता दुचाकीवरुन कोळेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शनानंतर ते मित्राबरोबर गप्पा मारत होते. त्यावेळी तिघे जण गाडीवरुन आले. त्यांनी प्रसाद यांच्याजवळ खेटून गाडी लावली. त्यांनी त्यांच्याकडे पाहिल्याने त्यातील एका मुलाने त्यांची गचांडी पकडून तू आम्हाला क्रॉस जातो का, आम्ही इथले भाई आहे. मला सोन्या हिवाळे म्हणतात, असे म्हणून त्याने हातातील दगड डोक्यात मारला. यश देसाई याने तुला लय माज आला आहे दाखवतोच तुला, असे म्हणून बाजूला असलेली कुंडी उचलून डोक्यात मारल्याने त्यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. गौरव याने हातातील दगडाने त्यांच्या डोक्यात मारले. ते खाली पडल्यावर तिघेही शिव्या देत निघून गेले. त्यानंतर मित्रांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड तपास करीत आहेत.
