Pune Crime News | लॉजवर गेल्याबाबत विचारल्याने पत्नी, मुलाने केली मारहाण; पत्नीने मुसळाने तर मुलाने सुरीने केले जखमी

पुणे : Pune Crime News | पार्वती लॉजमध्ये का गेली होतीस, असे विचारले असता पत्नी व मुलाने वडिलांना मारहाण करुन जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे. Pune Crime News)
याबाबत आबा राजाभाऊ गिरी (वय ४८, रा़ चर्होली खुर्द, ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात (Alandi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी आबा गिरी यांची पत्नी व मुलगा श्रीकृष्ण आबा गिरी (वय २५) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार चर्होलीतील त्यांच्या घरी सोमवारी सायंकाळी सहा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घरी असताना त्यांची पत्नी व मुलगा घरी आले. तेव्हा फिर्यादीने पत्नीला विचारले की तू पार्वती लॉजमध्ये का गेली होतीस. त्यावर तिने तू मला कोण विचारणार, असे म्हणून फिर्यादीस शिवीगाळ करुन खलबत्याचे मुसळीने डोक्यात उजव्या बाजूस मारुन जखमी केले. फिर्यादी ओरडल्यावर मुलगा श्रीकृष्ण याने कांदा कापण्याच्या सुरीने आपल्या वडिलांच्या हाताच्या मनगटावर वार करुन जखमी केले. सहायक पोलीस फौजदार यादव तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police Tadipari Action | येरवडा परिसरातील 4 सराईत गुन्हेगार तडीपार ! पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केली कारवाई
Maharashtra Assembly Election 2024 | दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींच्या ठिकाणी वाहन तळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध