Pune Crime News | पत्नीची चाकूने भोसकून हत्या, मृतदेहाचे तुकडे केले अन् सुटकेसमध्ये भरले, सासू-सासऱ्यांना माहिती देऊन पलायन; आरोपीला पुण्यातून अटक

पुणे : Pune Crime News | पत्नीची चाकूने भोसकून हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून ते सुटकेसमध्ये भरले. पत्नीच्या हत्येबाबतची माहिती त्याने सासू सासऱ्यांना फोनवरून कळवून फरार झाला. गौरी सांबेकर (वय-३२) असे हत्या झालेल्या महिलेचे आहे. तर राकेश राजेंद्र खेडकर Rakesh Rajendra Khedkar (वय-३६) असे आरोपीचे नाव आहे. पुण्यातून राकेशला पोलिसांनी अटक केली आहे. (Murder Case)
अधिक माहितीनुसार, राकेश खेडकर हा महाराष्ट्रातील आहे. तो सॉफ्टवेअर प्रोफेशनमध्ये बंगळुरूमध्ये कार्यरत आहे. राकेश याने पत्नी गौरीची चाकूने भोसकून हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून सुटकेसमध्ये भरले अन् घेऊन गेला. गुरूवारी (दि.२७) ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी बंगळुरूमधील हुलीमावू पोलिसांनी आरोपीला पुण्यातून अटक केली आहे.
राकेश आणि गौरी हे महाराष्ट्रातून नोकरीसाठी वर्षभरापूर्वी बंगळुरूला शिफ्ट झाले होते. गौरीने पत्रकारिताचे शिक्षण घेतले होते, तर राकेश हा एका खासगी कंपनीमध्ये सॉफ्टवेअरचे काम करत होता. राकेश याने गौरीचा निर्दयीपणे जीव घेतला. त्यानंतर पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे करून ट्रॉली बॅगमध्ये भरून घेऊन गेला.
राकेशने महाराष्ट्रात राहणाऱ्या सासू सासऱ्याला या घटनेची माहिती दिली अन् फरार झाला होता. सासू-सासऱ्यांनी कर्नाटक पोलिसांना संपर्क करत तक्रार दाखल केली. बंगळुरूमधील डोड्डनेकुंडी अपार्टमेंटजवळ गौरीचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळला. पोलिसांनी कसून तपास करत राकेश याला पुण्यातून बेड्या ठोकल्या. त्याची चौकशी करण्यात येत आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.