Pune Crime News | उत्तमनगरमध्ये तरुणींकडून वेश्या व्यवसाय करवुन घेणार्या महिलेला अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कक्षाने केली अटक
पुणे : Pune Crime News | तरुणींना वेश्या व्यवसायात आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवुन घेणार्या महिलेला अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षातील पथकाने अटक केली आहे.
गौरी विकास पवळे (वय ४५, रा. बधे कॉम्प्लेक्स, उत्तमनगर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.
उत्तमनगरमधील सरस्वतीनगर येथील योगिराज कॉम्प्लेक्समध्ये तरुणींना आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवुन घेतला जात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाला मिळाली. बातमीची पडताळणी करण्यासाठी तेथे बनावट ग्राहक पाठविण्यात आले. बनावट ग्राहकाने इशारा दिल्यानंतर ४ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी योगिराज कॉम्प्लेक्समधील फ्लॅट नंबर १०१ वर छापा टाकला़ तेथून २ पिडित तरुणीची सुटका केली. त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवुन घेणार्या गौरी पवळे हिला अटक केली. उत्तमनगर पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे, पोलीस उपनिरीक्षक विशांत चव्हाण, पोलीस अंमलदार तुषार भिवरकर, दत्ताराम जाधव, बबन केदार, अमेय रसाळ, वैशाली इंगळे, खेडेकर यांनी केली आहे.
