Pune Crime News | दुकानातून अंडरगारमेंटची चोरी करणार्‍या सेल्समनला येरवडा पोलिसांनी केले जेरबंंद; ‘जॉकी’ चा सेल्समन ‘जॉकी’चे अंडरगारमेंट नेत असे चोरुन

yerwada police

पुणे : Pune Crime News | कल्याणीनगर येथील कपड्याच्या दुकानात मालकाने मोठा माल भरला होता. असे असताना दुकानातील सेल्समन तरुणी अंडरगारमेंटचा माल संपत आला आहे, असे मालकाला सांगु लागल्या. त्यांनी पाहिले तर जॉकीचा अंडरगारमेंटचा माल संपत आला होता. तेव्हा मालकाचा दुकानातील सेल्समन तरुणीवर संशय आला. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले. तसेच या सेल्समन तरुणींना खोदुन खोदुन विचारले. तेव्हा त्यांनी ‘जॉकी’चा सेल्समन येत असतो. त्याच्यावर संशय व्यक्त केला. दरम्यान, हा सेल्समन १९ एप्रिल रोजी पुन्हा त्यांच्या दुकानात आला. तेव्हा दुकान मालक व सेल्समन तरुणींनी त्याला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या हवाली केले.

गणपत मांगीलाल डांगी Ganpat Mangilal Dangi (वय ४४, रा. विठ्ठलनगर, सिंहगड रोड) असे या अटक केलेल्या सेल्समनचे नाव आहे. गणपत डांगी याने ‘जॉकी’चा सेल्समन असल्याचा गैरफायदा घेऊन या दुकानातून चोरलेला माल त्याने दुसया दुकानदाराला दुकान बंद झाल्याने त्यांच्याकडील माल कमी किंमतीत देत असल्याचे सांगून विकला होता. गेल्या १० महिन्यात त्याने या दुकानातून तब्बल ८ लाख रुपयांचे लेडीज व जेन्टस अंडरगारमेंट, टि शर्ट, नाईट पँन्ट असा माल चोरुन नेला होता. त्यापैकी ७ लाख ३० हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

याबाबत सुरेंद्रकुमार राजेंद्रकुमार शर्मा (वय ३४, रा. मांजरी) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शर्मा यांचे कल्याणीनगर येथे एस एल एंटरप्रायजेस नावाचे कपड्यांचे दुकानात आहे. याशिवाय त्यांची हडपसर व इतरत्रही दुकाने आहेत. गणपत डांगी हा ‘जॉकी’ या कंपनीचा सेल्समन आहे. तो सेल्समन म्हणून कपड्यांच्या दुकानात जात. त्यांना कोणता माल पाहिजे याची ऑर्डर घेत असे.
अशी करत होता चोरी

शर्मा यांच्या कल्याणीनगर येथील दुकानात तो येत असे. सेल्समन असल्याने त्याला सर्व जण ओळख असत. किती माल आहे, हे तपासण्याच्या नावाखाली तो वरच्या मजल्यावर जात असे. तेथील सीसीटीव्हीवर काही तरी काही क्षण टाकत असे. स्वत: जवळ असलेल्या बॅगेमध्ये तो तेथील काहीच अंडरगारमेंटच्या वस्तू घेत असे. त्यानंतर पुन्हा सीसीटीव्हीवरील वस्तू काढून टाकत. विशेष म्हणजे तो फक्त ‘जॉकी’चे अंडरगारमेंटच चोरुन नेत असे.

पोलिसांनी गणपत डांगी याला पकडल्यानंतर पोलिसांनी त्याने चोरलेल्या या अंडरगारमेंटमधील लेडीज व जेन्टस अंडरगारमेंट, टि शर्ट, नाईट पन्ट हस्तगत केल्या आहेत. पोलीस उपनिरीक्षक प्रदिप सुर्वे तपास करीत आहेत.

ही कारवाई पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर, विजय ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदिप सुर्वे, पोलीस हवालदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, पोलीस अंमलदार अनिल शिंदे, अमोल गायकवाड, प्रशांत कांबळे, नटराज सुतार, विजय अडकमोल, बालाजी सोगे, भीमराव कांबळे, संदिप जायभाय, सुधीर सांगडे यांनी केली आहे.

You may have missed