Pune Crime News | उच्चभ्रु कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविणार्या स्पा सेंटरवर छापा टाकून येरवडा पोलिसांनी 2 तरुणींची सुटका करुन मॅनेजरला केली अटक
पुणे : Pune Crime News | कल्याणीनगरसारख्या उच्चभ्रु परिसरात मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणार्या निरा स्पा सेंटरवर येरवडा पोलिसांनी दोन तरुणींची सुटका करुन स्पा मॅनेजरला अटक केली आहे.
अरमान रहिमउद्दीन हुसेन Armaan Rahimuddin Hussain (वय २१, रा. विमाननगर, मुळ रा. आसाम) असे या स्पा मॅनेजरचे नाव आहे.
याबाबत पोलीस अंमलदार मोनिका पवार यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणीनगर मधील ईश्वरधाम अपार्टमेंटमध्ये निरा स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांना ३१मार्च रोजी मिळाली. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. बनावट ग्राहकाने इशारा केल्यानंतर पोलिसांनी रात्री साडेआठ वाजता या स्पावर छापा टाकला. तेथील स्पा मॅनेजर अरमान हुसेन याला ताब्यात घेतले. वेश्या व्यवसायाला प्रवृत्त करुन त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेतलेल्या २ तरुणींची सुटका केली. येरवडा पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त रजनीकांत चिलुमूला, सहायक पोलीस आयुक्त सुनिल जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक विजय ठाकर यांच्या सुचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील, पोलीस उपनिरीक्षक महेश फटांगरे, परि़ पोलीस उपनिरीक्षक शुभांगी चव्हाण, पोलीस अंमलदार कांबळे, मुकुंद कोकणे, शैलेश वाबळे, गणेश पालवे, साईनाथ म्हस्के, मोनिका पवार, दिव्या मोरे, सपना म्याना, सुवर्णा साळोखे यांनी केली आहे.
