Pune Crime News | पुणे : शेअर्स ब्रोकरचे अपहरण करुन एक कोटीची मागणी, अमरावतीमधून सुटका; डॉक्टरसह तिघांना अटक

Kidnapping Case

पुणे : Yerawada Pune Crime News | शेअर मार्केटमध्ये गुंतवलेल्या पैशांमध्ये (Investment In Share Market) झालेला तोटा भरुन काढण्यासाठी पुण्यातील शेअर मार्केटमध्ये ब्रोकरचे काम करणाऱ्या नितीन भास्कर सरोदे (वय-44 रा. वरणगाव, पुणे) यांचे त्यांच्याच कारमध्ये तिघांनी अपहरण केले. त्यानंतर त्यांच्याकडे एक कोटी रुपयांची मागणी केली. याबाबत माहिती मिळताच पथ्रोट (अमरावती) Amravati Police पोलिसांनी आरोपींना अटक करुन येरवडा पोलिसांच्या (Yerawada Police) ताब्यात दिले.येरवडा पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सरोदे यांची अमरावती येथून सुटका करुन तिघांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये डॉक्टरचा समावेश आहे.

डॉ. सुहास भांबुरकर (Dr. Suhas Bhamburkar), अल्पेश गुडदे, भुषण तायडे (सर्व रा. अमरावती) यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 140(3), 142, 308(4), 308(5), 3(5) नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत नितीन सरोदे यांचे मावस भाऊ संदीप अशोक भोळे (वय-41 रा. पाईपलाईन रोड, गणेश नगर, रावेत ता. हवेली) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. सरोदे यांचे 15 जुलै रोजी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास संगमवाडी पार्किंग नं. 1 येथून अपहरण करुन अमरावती येथे नेण्यात आले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मावस भाऊ नितीन सरोदे हे शेअर मार्केट ब्रोकर आहेत. तर डॉ. सुहास भांबुरकर हा त्यांचा क्लायंट असून त्याने सरोदे यांच्याकडे 50 लाख रुपये गुंतवले होते. मात्र, यामध्ये फसवणूक झाल्याने आरोपींनी सरोदे यांचे संगमवाडी पार्किंग येथून त्यांच्याच कारमधून कोयता व चाकूचा धाक दाखवून अपहरण केले. अमरावती येथे नेत असताना आरोपींनी नितीन यांच्याकडे एक कोटी रुपयांची मागणी केली. दरम्यान, सरोदे यांच्या घरच्यांनी फोन केल्यानंतर आरोपींनी त्यांना 20 लाख रुपये घेऊन अकोट येथे येण्यास सांगितले. मंगळवारी पथ्रोट पोलिसांनी तीन अपहरणकर्त्यांना अटक करुन सरोदे यांची सुटका केली. याबाबत येरवडा पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर येरवडा पोलिसांचे एक पथक पथ्रोट येथे रवाना झाले. पथ्रोट पोलिसांनी बुधवारी आरोपींना येरवडा पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर आरोपींना घेऊन येरवडा पोलीस गुरुवारी (दि.17) सकाळी पुण्यात आले.

हॉस्पिटलमध्ये झाली होती ओळख

डॉ. सुहास भांबुरकर हा मुळचा अंजनगाव सुर्जी येथील विहीगांव चा रहिवासी आहे. मागील तीन वर्षापासून तो पुण्यातील हॉस्पिटलमध्ये काम करत आहे. नितीन सरोदे याची आणि डॉ. सुहास यांची हॉस्पिटलमध्ये ओळख झाली. त्यावेळी नितीन याच्या सांगण्यावरून डॉ. सुहास याने शेअर मार्केटमध्ये 50 लाख रुपये गुंतवले होते. मात्र, यामध्ये मोठे नुकसान झाल्याने डॉ. सुहास याने इतर दोन साथीदारांच्या मदतीने सरोदे यांचे अपहरण केले.

कुटुंबाकडे 20 लाखांची मागणी

नितीन सरोदे बराचवेळ घरी आले नसल्याने त्यांच्या पत्नीने मोबाइलवर फोन केला. त्यावेळी अनोळखी व्यक्तीने फोन उचलला. त्याने सरोदे यांच्या पत्नीला सांगितले की, उद्यापर्य़ंत ते घरी येतील, याबाबत कोणाला काही सांगू नका. त्यावेळी सरोदे यांची पत्नी घाबरल्याने त्यांनी भुसावळ येथील भाऊ विशाल वारके याला याबाबत माहिती दिली. विशाल याने फोन केला असता अपहरणकर्त्यांनी 20 लाख रुपये घेऊन अकोट येथे येण्यास सांगितले.

सापळा रचून आरोपींना अटक

कारमध्ये नितीन यांच्या गळ्यावर कोयता ठेवून धमकावले तसेच हात-पाय बांधले. रात्री बाराच्या सुमारास आरोपी परतवाडा येथे आले. जोरदार पाऊस असल्याने आरोपींनी भूषण तायडे याची मदत घेतली. यानंतर तिघे पथ्रोट येथे गेले.
नितीन सरोदे यांचे अपहरण झाल्यानंतर येरवडा पोलिसांनी पथ्रोट पोलिसांना संपर्क केला.
त्यानंतर पथ्रोट पोलिसांनी परिसरात शोध घेऊन सापळा रचला. नाकाबंदी करुन प्रत्येक वाहनाची तपासणी केली.
पथ्रोट पोलिसांनी डॉ. सुहास भांबुरकर, कल्पेश गुडधे आणि भूषण तायडे यांना अटक करुन सरोदे यांची सुटका केली.

कारमधून हत्यारे जप्त

आरोपींनी ब्रोकर नितीन सरोदे यांचे ज्या कारमधून (एमएच 14 जेएन 8670) अपहण केले होते,
त्या कारमधून पथ्रोट पोलिसांनी हत्यार जप्त केले आहेत. कारमधून तीन ते चार धारदार हत्यारे जप्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी रस्त्यामध्ये सरोदे यांच्या एटीएम कार्डद्वारे 50 हजार रुपये काढले.
पुढील तपास येरवाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमर कदम करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sanjay Raut On Sharad Pawar | “शरद पवार हे देशाच्या राजकारणातील नटसम्राट तर भुजबळ हे…”; संजय राऊतांचा निशाणा

Ajit Pawar On Pimpri Chinchwad Assembly | पिंपरी चिंचवडला खिंडार पडल्यानंतर अजित पवारांची
विधानसभेबाबत भविष्यवाणी, म्हणाले…

Pune Crime News | पुणे: बनावट कागदपत्रांच्या आधारे रानडे चॅरिटी ट्रस्टची जमीन बळकावली, तीन जणांवर गुन्हा दाखल

You may have missed