Pune Crime News | एमबीए अ‍ॅडमिशनसाठी घेतलेले पैसे परत न केल्याने तरुणाला बेदम मारहाण; काचेची बाटली, सिलिंग फॅनच्या पात्याने मित्राला मारण्याचा प्रयत्न

marhan

पुणे : Pune Crime News | एम आय टी कोथरुड (MIT Kothrud) ऐवजी एम आय टी लोणी काळभोर (MIT Loni Kalbhor) येथे अ‍ॅडमिशन झाले.या अ‍ॅडमिशनसाठी घेतलेले २ लाख २० हजार रुपये परत करावे यासाठी चौघा जणांनी तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. काचेची बाटलीने पाठीत तर सिलिंग फॅनच्या पात्याने मारहाण केली. (Marhan)

याबाबत यासीन ईस्माईल शेख (वय ३९, रा. युनिटी कॉम्प्लेक्स, रास्ता पेठ) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी फुरकान शेख, इरफान शेख (रा. कॅम्प) व अन्य दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शिवाजी मार्केटमध्ये रविवारी रात्री सव्वा दहा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यासीन शेख व इरफाने शेख हे एकमेकांचे मित्र आहे. इरफान शेख याचा मुलाला एम बी ए करीता एम आय टी कोथरुड येथे अ‍ॅडमिशन मिळवून देण्याकरीता यासीन शेख याने इरफान शेख याची बंटी नावाच्या एजंटशी ओळख करुन दिली. हा अ‍ॅडमिशन करुन देईल, असे सांगितले. या बंटीने अ‍ॅडमिशनसाठी २ लाख २० हजार रुपये घेतले होते. परंतु, एम आय टी कॉलेजच्या कोथरुड येथे अ‍ॅडमिशन न होता ते लोणी काळभोर या ठिकाणी झाले. अ‍ॅडमिशनसाठी बंटी याने घेतलेले पैसे फिर्यादी यांनी घेतले आहेत, म्हणून इरफान याने फिर्यादीकडे पैश्यांची मागणी केली. तेव्हा फिर्यादी यांनी मी तुमच्याकडून पैसे घेतले नाहीत.

तुम्ही माझ्याकडे पैसे मागू नका, असे वेळोवेळी सांगितले होते. त्यानंतर रविवारी फुरकान शेख याने फिर्यादीला बोलावून घेतले.
अ‍ॅडमिशनचे पैसे परत देण्याच्या कारणावरुन शिवीगाळ केली. पैसे परत कर नाही तर तुला ठार मारु,
अशी दमदाटी केली. हाताने व लाथाबुक्क्यांनी छातीत, पोटात व पाठीत मारहाण केली. काचेच्या बाटलीने पाठीत मारहाण केली.
सिलिंग फॅनच्या पात्याने मारण्याचा प्रयत्न केला. पोलीस उपनिरीक्षक हनुमत तरटे (PSI Hanumant Tarte) हे तपास करीत आहेत. (Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत

Kolhapur Crime News | कोल्हापूर: स्पर्धा परीक्षेतील अपयशाच्या नैराश्यातून युवकाने संपवलं जीवन

You may have missed