Pune Customs News | गाईला विष देऊन केली वाघिणीची शिकार; 5 कोटींची कातडी जप्त; वाघाची कातडी विकणारे रॅकेट उध्वस्त
पुणे : Pune Customs News | वाघाची शिकार करून कातडी विकणारे मोठे रॅकेट सीमा शुल्क विभागाने कारवाई करत उध्वस्त केले आहे. दरम्यान या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेतले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या कातडीची किंमत पाच कोटी रुपये असल्याची माहिती आहे.
वाघाची कातडी विकणारा एक ग्रुप जळगाव जवळ आल्याची माहिती नागपूर सीमा शुल्क विभागाने पुणे सीमा शुल्क विभागाला दिली. त्याचा तपास करण्यासाठी २६ तारखेला पुण्यातून पथक निघाले. मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करत सीमा शुल्क विभागाने सहा जणांना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी सहा जणांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. रहीम रफिक हा या टोळीचा म्होरक्या असल्याची माहिती आहे.
ताब्यात घेण्यात आलेली कातडी ही पाच फूट लांब असणाऱ्या वाघिणीची असून ती चार ते पाच वर्षांची असल्याचे बोलले जातेय. सीमा शुल्क विभागाने या प्रकरणी वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. या तस्करांनी एका वन गाईला विष देऊन ठार मारलं आणि ती गाय वाघाच्या तोंडी दिली. ती गाय वाघाने खाल्ल्याने वाघाचा त्यामध्ये मृत्यू झाल्याचं तपासातून उघडकीस आलं आहे.
अटक करण्यात आलेल्यांपैकी रहीम खानची चौकशी केल्यानंतर त्याला यापूर्वी देखील फॉरेस्ट डिपार्टमेंटने अटक केली होती
अशी माहिती समोर आली आहे. तर मोहम्मद आशर खान हा भोपाळचा रहिवासी असल्याची माहिती आहे.
त्यामुळे जळगावात सापडलेल्या या प्रकरणाचा भोपाळ आणि त्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर काही संबंध आहे
का याचा तपास सुरु करण्यात आला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | नवीन मोटारसायकलची राईड बेतली जीवावर ! पाण्याच्या टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यु